आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला माझ्या करोडपती मुलाचा अभिमान नाही:एलन मस्क यांच्या वडीलांचा मुलाखतीत गौफ्यस्फोट, एरोल मस्क म्हणाले, दुसरा मुलगा किंबलचा मला अभिमान

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या एलन मस्कचे वडील एरोल मस्क यांनी एका मुलाखतीत अजब गौफ्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, मला माझ्या करोडपती मुलाचा अभिमान वाटत नाही. कारण संपूर्ण मस्क कुटुंबाने दिर्घकाळात बरेच काही साध्य केलेले आहे.

ऑस्ट्रेलियन रेडिओ स्टेशन KIIS FM वर 'काईल आणि जॅकी ओ' या कार्यक्रमात सोमवारी त्यांनी मुलाखत दिली. टेस्ला प्रमुख एलन आणि कुटुंबातील इतरांबद्दल एरोल यांनी अनेक खुलासे केले आहेत. ते म्हणाले की, एलन मस्कचा धाकटा भाऊ व माझा लहानामुलगा किंबल मस्क मला आनंददायी व अभिमानास्पद वाटतो. तर मुलाखतीत पुढे बोलताना करोडपती मुलगा एलन मस्कच्या यशाला कमी लेखले आहे. त्यांच्या शारिरीक स्वरूपाबाबतही त्यांनी वक्तव्य केले.

तुमचा मुलगा तर प्रतिभावान

रेडिओ जॅकी याने विचारले की, तुमचा मुलगा प्रतिभावान व्यक्ती आहे. त्याच्याकडे खूप पैसा आहे. त्याने खूप काही कमविले आहे. तुम्हाला याचा अभिमान आहे का ? तेव्हा 76 वर्षीय एरोल मस्क यांनी स्पष्ट भाषेत नाही उत्तर दिले. ते म्हणाले की, आमचे कुटुंब हे बऱ्याच वर्षांपासून खूप काही नवीन करीत आहे. असे नाही की आम्ही अचानक मोठे झालो आहोत. अचानक कोणतीच गोष्ट झालेली नाही आणि होतही नाही.

जगभर भ्रमंतीतून बरेच काही शिकलो

पुढे बोलताना एरोल म्हणाले की, माझी पहिली पत्नी माये मस्क, मुलगा एलन, टोस्का आणि किंबल तसेच त्यांच्या मुलासमवेत जगभर भ्रमंती केलेली आहे. आम्ही बर्‍याच गोष्टी पाहिल्या आहेत. आम्ही बर्‍याच गोष्टी एकत्र शिकलो आहेत. त्यात एलनने मात्र एक पाऊल पुढे टाकले आहे. परंतू करोडपती झालेला एलन त्याच्या करिअरमध्ये नियोजनाप्रमाणे पाच वर्ष अजूनही मागेच आहे. त्याच्या प्रगतीबद्दल एरोल अजूनही निराश आहेत. ​​​​​​एरोलचा दुसरा मुलगा किंबल मस्क, अब्जाधीश आहे की नाही हे अद्याप समोर आलेले नाही. तो एलनसारखा श्रीमंत व यशस्वी नसतानाही एरोल यांनी ठामपणे किंबल बद्दल अभिमान असल्याचे सांगीतले.

बातम्या आणखी आहेत...