आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूल:भारतीय प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची आयएसआयची तालिबानींना चिथावणी

काबूलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
तालिबानींशी लढण्यासाठी अफगाणिस्तानात २० महिलांचे विशेष कमांडो दल तैनात करण्यात आले आहे. - Divya Marathi
तालिबानींशी लढण्यासाठी अफगाणिस्तानात २० महिलांचे विशेष कमांडो दल तैनात करण्यात आले आहे.

अफगाणिस्तानवर वर्चस्वाचा प्रयत्न करणाऱ्या तालिबानला पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारची उघडपणे चिथावणी आहे. तालिबानमध्ये माेठ्या संख्येने पाकिस्तानी सामील हाेत आहेत. एवढेच नव्हे तर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय अनेक वर्षांपासून अफगाणिस्तानात भारताने उभारलेल्या मालमत्ता, वास्तूंना लक्ष्य करण्याचे आदेश देत आहे. भारत सरकारने दाेन दशकांत अफगाणिस्तानात अनेक विकासकामे केली. त्यासाठी तीन अब्ज डाॅलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. त्यात डेलाराम व जरांज सलमा धरण या दरम्यानचा २१८ किमी लांबीचा मार्ग, अफगाण संसद भवन यांचा समावेश आहे. संसद भवन तर भारताची माेठी भेट असून ते भारताच्या अफगाणिस्तान उभारणीतील याेगदानाचे माेठे प्रतीक आहे. परंतु अफगाणिस्तान सरकारच्या विराेधात तालिबानचे जाहीर समर्थन करण्यासाठी १० हजारांहून जास्त पाकिस्तानी त्यात सामील झाले आहेत.

प्रकल्प नष्ट केल्यास स्वत:चेच घर उद्ध्वस्त हाेणार
भारताचे अनेक प्रकल्प मने जिंकणारे

भारताने २० वर्षांत अफगाणिस्तानात अनेक आव्हानांना ताेंड दिले आहे. भारताने ४०० हून जास्त प्रकल्पांसाठी सुमारे ३ अब्ज डाॅलरहून जास्त निधी खर्च केला. हे प्रकल्प अफगाणिस्तानातील सर्व ३४ राज्यांत आहेत. अडीच हजारांहून जास्त अफगाणी विद्यार्थ्यांना सुमारे ५० काेटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली .भारताने काेराेना लसीचे ५ लाख डाेसही दिले. सुमारे २ लाख टन गहू व २ हजार टन डाळही उपलब्ध करून दिली. त्यावर ५०० काेटी रुपये खर्च झाला. -गौतम बम्बावले, माजी मुत्सद्दी

भारताकडे एअर पाॅवरचाही पर्याय उपलब्ध
तालिबानी दहशतवादी एअर पाॅवरपुढे लाचार दिसतात. युद्धाचे संपूर्ण चित्र पालटून टाकण्याची क्षमता या लष्करी क्षमतेत आहे. अमेरिकेने या क्षमतेचा वापर दूर बसून केला आहे. परिस्थितीला नियंत्रणात ठेवण्यासाठी या शक्तीचा वापर केला जाऊ शकताे. भारतही अफगाणिस्तानला लष्करी उपकरणे देऊन सैन्याला बळकट करण्यास तयार हाेऊ शकताे. -ले. ज. विनोद भाटिया, माजी सैन्य संचालन महानिदेशक

महिला देणार प्रत्युत्तर : २० स्पेशल कमांडो सैन्यात सामील
- अफगाण इंडिया फ्रेंडशिप डॅम (सलमा धरण). खर्च-१७७६ काेटी रुपये.
- दाेशी, चरीकार वीज केंद्र. खर्च- १८७ काेटी रुपये
- स्टाेर पॅलेस जीर्णाेद्धार. खर्च-३८ काेटी रुपये.
- मजारे शरीफ मशिदीसाठी टाइल्स प्रकल्प. खर्च-५२ लाख रुपये
- संसद भवन िनर्माण. खर्च ५ काेटी रुपये
- कृषी विद्यापीठ. खर्च-२५ लाख रुपये
- बामयान-याकलांग महामार्गाची उभारणी
- शहतूत धरणाचे कार्य सुरू
- मजारे शरीफ विमानतळाहून काबूल चाैपदरी मार्गाचे बांधकाम निर्माणाधीन.

बातम्या आणखी आहेत...