आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • ISI On The Trail Of 72 Absconding Members Of Tabligh In Pakistan, Pakistan Campaign With China To Fight Corona Virus

भास्कर ग्राउंड रिपोर्ट:पाकमध्ये तबलीगच्या फरार ७२ सदस्यांच्या मागावर आयएसआय, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी चीनसोबत मोहीम

इस्लामाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद । चीनचे लष्करी वैद्यकीय पथक येथे दोन महिने मुक्कामी राहणार आहे. - Divya Marathi
इस्लामाबाद । चीनचे लष्करी वैद्यकीय पथक येथे दोन महिने मुक्कामी राहणार आहे.
  • पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सच्या अहवालानुसार काेरोनामुळे देशात १.८० कोटी लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात.

(शाह जमाल)

पाकिस्तानात रविवारी कोरोनाची रुग्णसंख्या १९ हजार ८५४ झाली आहे. येथे १२९७ नवे रुग्ण आढळून आले, तर आतापर्यंत ४४६ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक १८० मृत्यू खैबर पख्तुनख्वा प्रांतात झाले. कोरोनाचा मुकाबला करताना सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. पंजाब प्रांताच्या हाफिजाबाद येथील प्रमुख मरकजमध्ये क्वॉरंटाइन तबलिगी जमातच्या ७२ सदस्यांनी पलायन केले आहे. त्यांना पकडण्यासाठी गुप्तचर यंत्रणा आयएसआयला कामाला लावण्यात आले आहे. दुसरीकडे लष्कराने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लष्कराने संपूर्ण देशात छावण्या, शस्त्र कारखाने, सीमेवरील प्रदेशांत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू केली. तिबेट बेल्ट, व्याप्त काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये ते दिसून येते. या सर्व भागांत जवान तैनात करण्यात आले आहेत. सैन्यातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय देशभरात सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी राखीव दल तैनात करण्यात आले आहे. लष्करातील वैद्यकीय टीमच्या मदतीसाठी चिनी सैन्यातील वैद्यकीय तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. चिनी डॉक्टर पाकिस्तानातील रुग्णालयांत सहज दिसून येतात. मेजर जनरल हुआंग किनजेन हे चीनच्या आरोग्य पथकाचे नेतृत्व करत आहेत. ते नऊ दिवसांपूर्वी पाकिस्तानात दाखल झाले होते. चीनची ही टीम दोन महिने पाकिस्तान मुक्कामी आहे. टीममध्ये रोग िनयंत्रक, आयसीयू तज्ञ व श्वासोच्छ्वासतज्ञांचा समावेश आहे. दुसरीकडे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर दबाव वाढत आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यात सरकार कमकुवत भासू लागल्याचा आरोप पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो यांनी केला आहे. आता इम्रान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. सरकारने मात्र आतापर्यंत २,०३,०२५ लोकांची तपासणी केल्याचा दावा केला आहे.

सुरक्षा उपकरणांवरून पाकिस्तानातील डॉक्टरांनाही संघर्ष करावा लागत आहे. चार दिवसांपूर्वी रावळपिंडी शहरात २६ वर्षीय डॉक्टरांचा कोरोनाबाधेमुळे मृत्यू झाला होता. एका तरुण डॉक्टरच्या मृत्यूमुळे हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांना धक्का बसला. वास्तविक आरोग्य कर्मचारी सुरुवातीपासूनच आवश्यक सुरक्षा उपकरणे व सुविधांची मागणी करत आले आहेत. सरकार त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरले आहे. तरुण डॉक्टरच्या मृत्यूच्या एक आठवड्यापूर्वी पेशावरमध्ये एका वरिष्ठ डॉक्टरचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. राष्ट्रीय आणीबाणीविषयक संस्थेच्या आकडेवारीनुसार देशात ४४४ आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यात २१६ डॉक्टर, ६७ परिचारिका, १६१ इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यंग डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मोहंमद फजल म्हणाले, बहुतांश बाधित डॉक्टर बेचैन व मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावरील निगराणीसाठी मानसतज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात सरकार लॉकडाऊनमध्ये सवलत देण्याची शक्यता आहे.

५ राज्यांत ९४ टक्के रुग्ण

> पंजाब 7,106 > सिंध 7,102 > खैबर पख्तुनख्वा 2,907 > बलुचिस्तान 1,172 > इस्लामाबाद 393

बातम्या आणखी आहेत...