आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी एक धोका:काबूल विमानतळावर आयएसआयएस करू शकतो हल्ला; अमेरिकी लष्कर तयार करतेय पर्यायी मार्ग

वॉशिंग्टन/ काबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र काबूल विमानतळाबाहेरचे आहे. येथे गर्दी नियंत्रित करून लोकांना विमानतळात जाऊ देणाऱ्या नाटो सैन्याच्या कंटेनरवर तालिबान उभे राहिले. मात्र, दोन्हीकडून सामंजस्य दिसून आले. - Divya Marathi
छायाचित्र काबूल विमानतळाबाहेरचे आहे. येथे गर्दी नियंत्रित करून लोकांना विमानतळात जाऊ देणाऱ्या नाटो सैन्याच्या कंटेनरवर तालिबान उभे राहिले. मात्र, दोन्हीकडून सामंजस्य दिसून आले.

तालिबानच्या नियंत्रणानंतर अफगाणिस्तानात ९ दिवसांपासून सुरू असलेल्या बचाव मोहिमेत आता अतिरेकी हल्ल्याचे सावट आहे. काबूल विमानतळावर गर्दी नियंत्रणात असलेल्या सैनिकांना क्रूर अतिरेकी संघटना इस्लामिक स्टेट म्हणजे आयएस अतिरेकी आत्मघाती हल्ला करू शकतात अशी भीती सैन्य कमांडरना वाटत आहे. हल्ल्याचा अलर्ट मिळाल्यानंतर विमानतळ परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच अमेरिकी सैन्य विमानतळासाठी पर्यायी मार्ग तयार करत आहेत. अधिकारीही गर्दीवर कडक लक्ष ठेवून असून शस्त्र तपासणीसाठी ठिकठिकाणी गुप्त सेन्सर लावण्यात आले आहेत. अमेरिकी अधिकाऱ्यांनुसार हे नवे मार्ग अमेरिकी, तिसऱ्या पक्षाचे नागरिक आणि विशेष अफगाणींसाठी उपलब्ध असतील. एका अमेरिकी सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की,ज्या पद्धतीने विमानतळावर हजारो जणांची गर्दी व गोंधळ झाला आहे. इस्लामिक स्टेट खुरासान (आयएसआयएस-के)चे अतिरेकी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. दरम्यान, व्हाइट हाऊसने म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांचे सुरक्षा पथक अफगाणिस्तानची सुरक्षा स्थिती आणि अतिरेकी संघटना आयएसआयएसच्या संभाव्य धोक्यांबाबत चर्चा केली आहे.

अमेरिकेला मदत करणाऱ्यांना लक्ष्य करायचे आहे आयएसआयएसला
जे अफगाणी नागरिक काबूल विमानतळावर जमले आहेत ते सर्व अमेरिकेचे समर्थक आहेत. त्यांनी अमेरिकेला मजबूत करण्याची मदत केली असे खुरासानला वाटते. ३१ ऑगस्टपर्यंत सर्व नागरिकांना अफगाणिस्तानातून काढण्याचे लक्ष्य अमेरिकेने ठेवले आहे. यासाठी अमेरिकेने तालिबानच्या टॉप लीडर्ससोबत चर्चा केली आहे. यानंतर तालिबान राजी झाला व विमानतळापासून मागे हटला. लोकांना काढण्यासाठी अमेरिकेने आणखी ९०० जवान विमानतळावर पाठवले आहेत. त्यांनी अॅडव्हायझरीत म्हटले आहे की, ज्यांना अमेरिकेच्या सरकारच्या प्रतिनिधींनी प्रवास करायला सांगितले आहे त्यांनीच काबूल विमानतळावर यावे.

संबंध : अल कायदावरील निष्ठेतून आयएसआयएसची पायाभरणी
इराकमध्ये २००३ ते २०११ पर्यंत गृहयुद्धात अतिरेकी गट ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ने पाय राेवले. त्याची सुरुवात १९९९ मध्ये अबू मुसाब अल जरकावी याने ‘जमात अल तवाहिंद वल जेहाद’ (जेटीजे) नावाच्या अतिरेकी टोळीतून केली. २००४ मध्ये जरकावीने अल कायदा प्रमुख आेसामा बिन लादेनशी निष्ठा जाहीर केली होती. तेव्हा जेटीजेचे नाव ‘जेटीजे अलकायदा इन इराक’ झाले. जानेवारी २००६ मध्ये अलकायदा इन इराक ने ‘मुजाहिदिन शूरा परिषद’ बनवली. नंतर जरकावीचा मृत्यू झाला.

अबू बकरने आयएसच्या नावात लेवांत जोडले : अबू अब्दुल्ला अल राशिद अल बगदादीचा प्रमुख झाल्यानंतर ऑक्टोबर २००६ ला अलकायदा इन इराक याचे नाव ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक’ झाले. एप्रिल २०१० मध्ये बगदादी मारला गेला. मग अबू बकर अल बगदादी प्रमुख झाला. त्याने ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेवांत’ (आयएसआयएल) नाव केले.

२०१५ मध्ये खुरासान उभे केले : बकर याने २०१४ ला स्वत:ला खलिफा जाहीर केले. २०१५ मध्ये त्याने अफगाणिस्तानात आयएस खुरासान प्रॉव्हिन्सही उभे केले. त्याविरोधात अल कायदाने युद्ध केले. नंतर दोघे तालिबानसाठी लढू लागले.

बातम्या आणखी आहेत...