आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॉर्वेची राजधानी ओस्लो येथे कुराण जाळल्यानंतर काही वेळातच इस्लामविरोधी गटाच्या नेत्याची कार धडकून उलटवली गेली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक चालक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
या दोघांवर 'स्टॉप द इस्लामायझेशन ऑफ नॉर्वे' या कट्टरपंथी गटाचा नेता लार्स थॉरसन यांच्या SUVला जाणीवपूर्वक धडक दिल्याचा आरोप आहे. अपघातावेळी कारमधील 5 जण जखमी झाले असून त्यापैकी एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रस्त्याच्या मधोमध कुराण जाळल्यानंतर झाला हा अपघात
काही इस्लामविरोधी कार्यकर्त्यांनी प्रथम जळते कुराण चौकात टाकले. त्यानंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. नंतर येथे मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि नंतर एका महिलेने जळत असलेले पुस्तक उचलले.
या संपूर्ण घटनेनंतर थॉरसन आपल्या साथीदारांसह निघून गेला. काही वेळाने एका मर्सिडीजने त्याचा पाठलाग करून त्याला धडक दिली.
गेल्या आठवड्यात ओस्लो येथे झाला गोळीबार
आठवडाभरापूर्वी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे झालेल्या गोळीबारात दोन जण ठार तर 21 जण जखमी झाले होते. शहरातील वार्षिक 'प्राइड परेड' दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर नॉर्वेच्या देशांतर्गत गुप्तचर संस्थेने या हल्ल्याला इस्लामिक दहशतवादाशी जोडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.