आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअफगाणिस्तानात तालिबानने सरकार स्थापन केल्यानंतर आता सत्तेची सूत्रे हाती घेतली आहेत. बुधवारी चार पानांचा जाहीरनामा जारी झाला. त्याला ‘लिडर ऑफ इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ अमीर उल मुमीनिन शेख उल हदिथ हिब्तुल्लाह अखुंदजादाकडून जाहीर करण्यात आले आहे. अखुंदजादा सरकारचे पंतप्रधान आहेत. जाहीरनाम्यात सरकारची भूमिका मांडण्यात आली. सर्व लोकांनी इस्लामिक नियम व शरिया कायद्यानुसार काम करावे. त्यातून देशाची प्रगती साधावी.
सरकार इस्लामिक नियम व शरिया कायद्यानुसार वाटचाल करेल. कार्यकारी सरकार लवकरच जबाबदारी हाती घेऊन प्रत्यक्ष कारभारास सुरुवात करेल. तालिबानने परदेशी सैन्यापासून देशाला स्वातंत्र्य मिळवणे, देश स्वतंत्र-स्थिर असावा. इस्लामिक पद्धतीनुसार शेजारी राष्ट्रांशी दुतर्फा सन्मानकारक संबंध ठेवले जातील, असा मुद्दाही आहे. मीडियाचे स्वातंत्र्य, दर्जात वाढ, इस्लाम व राष्ट्रीय हितामधील भूमिका निश्चित केली जाईल.
महिलांना कोणत्याही खेळात सहभागी होता येणार नाही’
तालिबानविरोधात काबूलमध्ये सलग तिसऱ्या दिवशी निदर्शने सुरूच ठेवली. तालिबानने महिलांना तळघरात डांबले होते. सत्तेवर येताच दुसऱ्या दिवशी तालिबानने खरा चेहरा दाखवला. महिलांना कोणत्याही खेळात सहभागी होता येणार नाही, असे तालिबानच्या संस्कृती आयोगाचे अहमदुल्ला वासिकने एका मुलाखतीत सांगितले.
नागरिकांची केली सुटका
अफगाणिस्तानात तालिबानींच्या दहशतीमुळे हजारो अफगाणींनी पाकिस्तानात पलायन केले होते. परंतु पाकिस्तानने आता २०० लोकांना मायदेशी पाठवले आहे. त्यात महिला व मुलांचा समावेश आहे. हेरातमध्ये तालिबानविरोधातील आंदोलनमध्ये गोळीबार झाला. त्यात २ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत ८ लोक जखमी झाले. देशात आंदोलन दडपण्याचे काम तालिबान करत आहे.
पंजशीर : नॉर्दर्न अलायन्स म्हणाले, तालिबान सरकार आम्हाला अमान्य
पंजशीर खोऱ्यात तालिबानविरोधातील नॉर्दर्न अलायन्सने तालिबान सरकारला स्वीकारण्यास नकार दिला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील या सरकारला नाकारले जावे असे आवाहन केले. तालिबान सरकारमध्ये कोणत्याही महिलेचे समावेश नाही. हे अयोग्य आहे, असे संघटनेने म्हटले आहे.
आश्वासन मोडले : तालिबानने ५ पत्रकारांना केली अटक
जाहीरनाम्यात मीडियाचा उल्लेख करणाऱ्या तालिबानने काबूलमधील एतिलाट्रोजच्या पाच पत्रकारांना अटक केली आहे. वृत्तपत्राचे संपादक जकी दरयाबी यांनी त्याची पुष्टी केली आहे. अटकेबाबत संयुक्त राष्ट्राचे मानवी हक्क तज्ञ म्हणाले, अफगाणच्या पत्रकारांना तत्काळ सुरक्षा दिली जावी. त्यांच्या जीवितास धोका निर्माण होता कामा नये.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.