आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:लसीचा तिसरा डाेस घेणारा इस्रायल ठरला पहिला देश, 57 टक्के लोकसंख्येच्या पूर्ण लसीकरणानंतर निर्णय

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटनमध्ये 19 पासून अनलॉक, मास्क अिनवार्य

काेराेनाची तिसरी लस घेणारा इस्रायल हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. येथे साेमवारपासून फायझर-बायाेएनटेकचे डाेस देण्यास सुरुवात झाली आहे. सरकारने डेल्टा व्हेरिएंटचे नवे रुग्ण वाढल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. इस्रायलच्या आराेग्य विभागाने तिसऱ्या डाेसबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्यानुसार राेगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लाेकांना फायझर- बायाेएनटेकचा डाेस दिला जाणार आहे. हृदय, फुप्फुस, कर्कराेगाचे रुग्णही ही लस घेऊ शकतात. किडनी प्रत्याराेपण झालेल्या रुग्णांनादेखील तिसरा डाेस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले. इस्रायलमध्ये शेबा मेडिकल सेंटरचे तज्ञ प्राे. गालिया रहव म्हणाले, सद्य:स्थितीत तिसरा डाेस घेण्याचा निर्णय याेग्यच आहे. आम्ही सातत्याने तिसऱ्या डाेसच्या उपयाेगितेबद्दलचे संशाेधन करत हाेताे. इस्रायलमध्ये महिनाभरापूर्वी डेल्टा व्हेरिएंटचे दरराेज किमान १० रुग्ण आढळून येत हाेते. आता डेल्टा व्हेरिएंटचे राेज ४५२ रुग्ण आढळून येत आहेत. त्यावरून गांभीर्य लक्षात येते.

ब्रिटनमध्ये 19 पासून अनलॉक, मास्क अिनवार्य
ब्रिटनचे पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन यांनी विनामास्क कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात येईल, असा इशारा दिला आहे. १९ जुलैपासून अनलाॅक आहे. स्वातंत्र्य असले तरी नियमांचे पालन करण्यात यावे, असे जाॅन्सन यांनी म्हटले आहे. त्यातही सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरण्यास मनाई केली आहे. माेठ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी काेविड-१९ च्या तपासणी प्रमाणपत्रास अनिवार्य आहे, असे जाॅन्सन यांनी म्हटले .

अमेरिकेत स्थिती आणखी बिकट हाेण्याची शक्यता
अमेरिकेत काेराेनाची अत्यंत बिकट स्थिती हाेऊ शकते, असा दावा टाइममधून करण्यात आला आहे. तरुण लसीकडे कानाडाेळा करत आहेत हे त्यामागील कारण आहे. अमेरिकेत अजूनही १८ वर्षांवरील सुमारे ९.७४ काेटी लाेकांनी डाेस घेतलेला नाही. लाेक विनामास्कही फिरू लागले आहेत. मोठे कार्यक्रम जोखमीचे ठरू शकतात.

जगभरात : आॅस्ट्रेलियात विक्रमी रुग्ण
- आॅस्ट्रेलियात साेमवारी १२१ नवे रुग्ण आढळून आले. गेल्या दहा महिन्यांतील ही एका दिवसातील सर्वात माेठी रुग्णसंख्या असल्याचे सांगण्यात आले. त्या आधी ९ सप्टेंबर २०२० राेजी ९१ रुग्ण आढळले हाेते.
- फ्रान्समध्ये आराेग्य कर्मचाऱ्यांसाठी काेराेनाची लस अनिवार्य केले आहे.

कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असल्यास तिसरा डोस देता येऊ शकेल
- तिसरा डाेस घेणे गरजेचे आहे का?

इस्रायलने काेराेनाचा तिसरा डाेस देण्यास सुरुवात केली आहे. इतर देशांतही त्यासंबंधी अभ्यास केला जात आहे. त्यास बूस्टर डाेस म्हटले जात आहे. हा डाेस िकती उपयाेगी आहे? किती गरजेचा आहे याबद्दल जाणून घेऊया..
- बूस्टर डाेसची कल्पना कुठून आली?
फायझर-बायाेएनटेकने बूस्टर किंवा तिसरा डाेस अशी कल्पना पुढे आणली आहे. आधी त्यास अमेरिकेत मंजुरी मिळावी असे त्यांना वाटत हाेते. तिसरा डाेस डेल्टा व्हेरिएंटच्या दृष्टीने जास्त प्रभावी ठरेल, असा दावा कंपनीने केला आहे.
- काेराेनाचा तिसरा डाेस काेणास देता येऊ शकेल?
काेराेनाचा तिसरा डाेस कमकुवत राेगप्रतिकारशक्ती असलेल्या लाेकांना देता येऊ शकताे. त्यातही हृदय, फुप्फुस, कर्कराेगाने पीडित असलेल्यांंना हा डाेस देता येऊ शकताे.
- तिसरा डाेस कधी देता येऊ शकताे?
फायझरच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या डाेसच्या सहा महिन्यांनंतर तिसरा डाेस देता येऊ शकताे. हा डाेस दुसऱ्या डाेसच्या १२ महिन्यांपर्यंत देता येणे शक्य आहे.
- तिसऱ्या डाेसचे फायदे काय?
तिसरा डाेस मूळ काेराेना विषाणू, बीटा व डेल्टा व्हेरिएंटच्या विराेधात अँटिबाॅडीची शक्ती वाढवताे.तज्ञ फायझरच्या दाव्यांशी सहमत आहेतअमेरिकेतील सार्वजनिक आराेग्य क्षेत्रातील तज्ञांनी फायझरचे दावे संधिसाधूपणाचे व बेजबाबदार स्वरूपाचे म्हटले आहे. कारण अशा दाव्यांची सत्यता पडताळणीसाठी अनेक महिन्यांच्या अभ्यासाची गरज असते.
- तिसरा डाेस खूप गरजेचा आहे?
तिसरा डाेस घेणे फार गरजेचे नाही, असे तज्ञांनी म्हटले आहे. जगभरात तसे तर लसीकरणाचे प्रमाण खूप अल्प असतानाही ही गाेष्ट गरजेची नाही.

बातम्या आणखी आहेत...