आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायल-पॅलेस्टाइन वाद:हमासचे 15 किमी लांब भुयार इस्रायलने केले उद्ध्वस्त; भारताने केला निषेध

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इस्रायल-पॅलेस्टाइन वादावर तोडगा काढणे अवघड

इस्रायल आणि पॅलेस्टिनी संघटना हमास यांच्यात गेल्या ९ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. सोमवारी इस्रायल डिफेन्स फोर्सने दावा केला की, इस्रायलने १५ किमी लांब भुयार उद्ध्वस्त केले. इस्रायल व हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात ५८ पेक्षा जास्त मुलांचा समावेश आहे. इस्रायल-पॅलेस्टाइन मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने इस्रायलने गाझावरील हल्ले वाढवले आहेत. या हल्ल्यांवरून आंतरराष्ट्रीय पातळीवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

संयुक्त राष्ट्रात भारताने इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच हिंसाचार लवकर थांबवा, असे म्हटले आहे. बहुतांश देशांना यावर शांततामय तोडगा हवा आहे. हमासचे उपनेते मौसा अबू मरजौक यांनी सांगितले की, कोणताही करार आमच्या अटींवर होईल, इस्रायलच्या नव्हे. जर इस्रायलला थांबायचे नसेल तर आम्हीही थांबणार नाहीत. अमेरिका, कतार, इजिप्त आणि इतर देशांकडून युद्धविरामाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, चीनने अमेरिकेवर आरोप करून वाद निर्माण केला आहे. चीनने म्हटले आहे की, अमेरिका संयुक्त राष्ट्राला काम करू देत नाहीये, अडथळे आणत आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी सांगितले की, अमेरिका संयुक्त राष्ट्राला या हिंसाचाराविरोधात मोकळेपणे बोलू देत नसल्याबद्दल त्यांना खेद आहे. अमेरिकेने त्यांची जबाबदारी पार पाडावी असे आम्ही आवाहन करत आहोत.

सुरक्षा परिषदेचा इशारा- तोडगा न निघाल्यास संकट नियंत्रणाबाहेर जाईल
संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इशारा दिला आहे की, संघर्ष थांबला नाही तर पूर्ण भाग अनियंत्रित संकटात सापडेल. ते म्हणाले, गाझामध्ये होत असलेला हिंसाचार खूपच भीषण असून तो त्वरित थांबायला हवा. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने गाझात युद्धबंदीसाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थांसोबत बैठकही घेतली, मात्र त्यात तोडगा निघू शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...