आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणवर हल्ल्याची तयारी:इस्रायलने म्हटले- अमेरिकेने साथ दिली नाही तर एकट्याने हल्ला करू, परिणामांची पर्वा नाही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्रायलचे हवाईदल प्रमुख हेरजी हालेवी यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, त्यांचा देश इराणवर हल्ला करण्यासाठी सज्ज आहे. हेरजींच्या म्हणण्यानुसार, इराणवरील हल्ल्यादरम्यान अमेरिका मदत करते की नाही याची आम्हाला पर्वा नाही, जर त्यांनी पाठिंबा दिला नाही तर आम्हाला काही अडचण नाही, आम्ही एकटे इराणला अण्वस्त्रे बनवण्यापासून रोखू शकतो.

इराण अण्वस्त्रे बनवण्याच्या जवळ जात असल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. जर इराण अण्वस्त्रे बनवण्यात यशस्वी झाला तर त्यामुळे इस्रायलसह अनेक अरब देशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, त्यामुळे इराणला अणुशक्ती बनण्यापासून कोणत्याही परिस्थितीत रोखले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

इस्रायलकडे जगातील सर्वात घातक लढाऊ विमानांपैकी एक F-35 आहे.
इस्रायलकडे जगातील सर्वात घातक लढाऊ विमानांपैकी एक F-35 आहे.

अॅक्शनसाठी सज्ज

इस्रायलच्या आर्मी रेडिओला दिलेल्या मुलाखतीत हवाई दल प्रमुख म्हणाले - आम्ही इराणविरुद्ध अॅक्शन घेण्यास पूर्णपणे सज्ज आहोत. आमच्याकडे एवढी ताकद आहे की आम्ही हजारो किलोमीटर दूर किंवा देशाजवळचे कोणतेही ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडू शकतो. आम्ही एवढी क्षमता आत्मसात केली आहे की, दुरून कोणत्याही लक्ष्याला निशाणा बनवू शकतो. लक्ष्य किती दूर किंवा किती जवळ आहे हे महत्त्वाचे नाही.

दुसर्‍या प्रश्नाच्या उत्तरात, इस्रायली हवाई दल प्रमुख म्हणाले - एकट्याने हल्ला कसा करायचा आणि त्यात यश कसे मिळवायचे हे आम्हाला चांगले माहित आहे. या मिशनमध्ये अमेरिकेनेही साथ दिली तर बरे होईल. त्यात ते सहभागी झाले नाही तरी हरकत नाही, अशी मोहीम स्वतःहून यशस्वीपणे पूर्ण करण्याची ताकद इस्रायलकडे आहे.

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे निकटवर्तीय मंत्री जाची हेंग्बी यांनी 2022 मध्ये इराणवर एकट्याने हल्ला करण्याची धमकी दिली होती.
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे निकटवर्तीय मंत्री जाची हेंग्बी यांनी 2022 मध्ये इराणवर एकट्याने हल्ला करण्याची धमकी दिली होती.

तणाव वाढतच चालला

गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि इराणमधील तणाव झपाट्याने वाढला आहे. इस्रायलच्या हवाई दलाने सीरियावर हल्ला केला आणि त्यात काही इराणी सैनिक ठार झाल्याचा आरोप इराणने केला आहे. दुसरीकडे इराणी सैनिक सीरियात कोणत्या उद्देशाने उपस्थित होते, असा प्रश्न इस्रायलने केला आहे.

इराण सरकार किंवा लष्कराने सीरियामध्ये इराणी सैनिक काय करत होते हे सांगितले नाही, उलट त्यांनी धमकी दिली की या हल्ल्याचा बदला घेतला जाईल. तेहराणने म्हटले- जर इस्रायल हल्ला करू शकत असेल तर आम्हीही सक्षम आहोत. याचे उत्तर योग्य वेळी नक्कीच मिळेल.

दुसरीकडे, अमेरिका याप्रकरणी अजूनही मौन बाळगून आहे. इराणला राजनैतिक मार्गाने अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखता येईल, असे जो बायडेन यांनी म्हटले आहे. इस्रायलला हे मान्य नाही.

इस्रायलचे हवाई दल प्रमुख हेरजी हालेवी यांनी दुसऱ्यांदा इराणवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
इस्रायलचे हवाई दल प्रमुख हेरजी हालेवी यांनी दुसऱ्यांदा इराणवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे.

मंत्र्यांनीही तशीच धमकी दिली

फेब्रुवारी 2022 मध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे निकटवर्तीय कॅबिनेट मंत्री झाची हेंग्बी म्हणाले होते - जर अमेरिका इराणच्या विरोधात आम्हाला पाठिंबा देत नसेल किंवा त्यांच्याशी करार करत असेल तर आम्हाला काही फरक पडत नाही, इस्रायल एकटाच इराणवर हल्ला करेल आणि त्यांची आण्विक सुविधा ठिकाणे नष्ट करेल.

इस्रायली मंत्र्याचे विधान अमेरिकेच्या जो बायडेन सरकारला संदेश मानला जात आहे. वास्तविक, 2015 मध्ये बराक ओबामा यांच्या काळात अमेरिका आणि इराणमध्ये अणुकरार झाला होता. 2017 मध्ये ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी तो रद्द केला. आता बायडेन पुन्हा इराणशी करार करण्याबाबत बोलत आहेत, तर इस्रायलने याप्रकरणी कोणतीही तडजोड करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हेंग्बी यांचे विधान या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे होते, कारण त्यांनी यापूर्वी गृहमंत्री, लष्करी गुप्तचर प्रमुख आणि गुप्तचर संस्था मोसादचे नेतृत्व केले आहे. ते अजूनही मोसादला सल्ला देतात, असे मानले जाते.

बायडेन प्रशासन इराणशी पुन्हा करार करण्याच्या मनस्थितीत आहे, इस्रायलला ते मान्य नाही.
बायडेन प्रशासन इराणशी पुन्हा करार करण्याच्या मनस्थितीत आहे, इस्रायलला ते मान्य नाही.

या विधानांचा अर्थ समजून घ्या

ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेने इराणविरोधात कठोर भूमिका घेतली होती. ट्रम्प यांच्या मंजुरीनंतर, इराणचा सर्वात मोठा आणि राष्ट्रपतींपेक्षाही लोकप्रिय लष्करी कमांडर जनरल कासिम सुलेमानी इराकमध्ये मारला गेला. तेहराणमध्ये दोन अणुशास्त्रज्ञ मारले गेले. हे सर्व हल्ले इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे केले होते. न्यूयॉर्क टाइम्सनेही याबाबत खुलासा केला होता. आता बायडेन जुन्या कराराची अंमलबजावणी करून इराणबाबत मवाळ भूमिका स्वीकारण्याचे संकेत देत आहेत. यामुळे इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील मतभेद वाढत आहेत.

ट्रम्प यांच्या काळात इस्रायल आणि 5 अरब देशांमधील 60 वर्षे जुने वैर संपले होते. आता ते खूप जवळ आले आहेत. अरब देशांसाठी इराण हा सर्वात मोठा धोका आहे. त्यांच्याकडे आता इस्रायलच्या रुपाने एक खूप शक्तिशाली मित्र आहे.

3 वर्षांपूर्वी 3 हत्या : कोणाची, कधी आणि कशी हत्या झाली?

जनरल कासिम सुलेमानी

ट्रम्प यांच्या आदेशानुसार इराकमध्ये जनरल कासिम सुलेमानी यांची हत्या करण्यात आली होती.
ट्रम्प यांच्या आदेशानुसार इराकमध्ये जनरल कासिम सुलेमानी यांची हत्या करण्यात आली होती.

ते इराणच्या स्पेशल फोर्सेसचे कमांडर-इन-चीफ होते. ते इराणी जनतेत राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय होते. 3 जानेवारी 2020 च्या रात्री गुप्त भेटीसाठी ते इराकची राजधानी बगदाद येथे पोहोचले. सीआयएने कारमध्ये बसलेल्या सुलेमानींना रॉकेट हल्ल्यात ठार केले. इराणमध्ये राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला. अमेरिकेला सूडाची धमकी देण्यात आली. आजपर्यंत काहीही झाले नाही.

अबू मोहम्मद अल मासरी

अबू मोहम्मद अल-मासरी हा बिन लादेनचा व्याही होता. तेहराणमध्ये मोसादने त्याची हत्या केली होती.
अबू मोहम्मद अल-मासरी हा बिन लादेनचा व्याही होता. तेहराणमध्ये मोसादने त्याची हत्या केली होती.

अल कायदामध्ये अल मासरी दुसऱ्या क्रमांकावर होता. हबीब दाऊदच्या नावाने तेहराणमध्ये तो लपला होता. तो ओसामा बिन लादेनचा मित्र होता. 7 ऑगस्ट 2020 रोजी काही लोकांनी मासरी आणि त्याच्या मुलीला कारमध्ये मारले. इराणने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु न्यूयॉर्क टाइम्स आणि सीएनएनने स्पष्ट केले की मासरीची हत्या मोसादच्या गुप्तहेरांनी केली आहे. विशेष म्हणजे मासरीच्या मृत्यूवर इराणने आतापर्यंत मौन बाळगले आहे.

मोहसीन फखरीजादेह

मोहसीन फखरीजादेह हे इराणच्या आण्विक कार्यक्रमाचे प्रमुख होते. तेही तेहराणमध्ये मारले गेले.
मोहसीन फखरीजादेह हे इराणच्या आण्विक कार्यक्रमाचे प्रमुख होते. तेही तेहराणमध्ये मारले गेले.

मोहसीन हे इराणच्या अणु कार्यक्रमाचे प्रमुख होते. 27 नोव्हेंबर 2020 रोजी तेहराणमध्ये काही लोकांनी त्यांची कारमध्ये हत्या केली. हे काम मोसादने केल्याचा इराणचा आरोप आहे. 2010 ते 2012 दरम्यान आणखी चार इराणी अणुशास्त्रज्ञ मारले गेले होते. हे सर्वजण मोहसीन यांचे सहकारी होते. मोहसीन यांच्या हत्येवर अमेरिका आणि इस्रायलने अधिकृतपणे काहीही म्हटलेले नाही. तथापि, मोहसीन यांची हत्या मोसादने केल्याचे यूएसए टुडेने स्पष्ट केले आहे.

इराण लवकरच अण्वस्त्रे बनवू शकेल असा अमेरिका आणि इस्रायलचा विश्वास आहे.
इराण लवकरच अण्वस्त्रे बनवू शकेल असा अमेरिका आणि इस्रायलचा विश्वास आहे.

वादाचे मूळ

  • जवळपास 22 वर्षांपासून इराण आण्विक ताकद मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. इराणने अण्वस्त्रे विकसित केल्यास जगाला धोका निर्माण होईल, असे अमेरिका, इस्रायल आणि अरब जगतासह पाश्चात्य देशांना वाटते.
  • 2010 मध्ये, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, युरोपियन युनियन आणि अमेरिकेने इराणला रोखण्यासाठी निर्बंध लादले. यापैकी बहुतेक अजूनही चालू आहेत.
  • 2015 मध्ये इराणचा या शक्तींसोबत करार झाला होता. सुमारे पाच वर्षे इराणला दिलासा मिळत राहिला.
  • जानेवारी 2020 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा करार रद्द केला. इराणवर कठोर निर्बंध लादले. बायडेन आल्यावर त्यांनी इराणबाबत मवाळ भूमिका घेतली.