आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महामारी:इस्रायल तिसऱ्यांदा लॉक; घरापासून 1 किमी अंतरावर जाण्यास निर्बंध, वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारचा निर्णय

तेल अवीव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेमध्ये कोरोना रुग्णसंख्या पोहोचली 2 कोटींच्या उंबरठ्यावर

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता इस्रायलने देशभरात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. कोरोना दुष्टचक्रात इस्रायलने तिसऱ्यांदा लॉकडाऊन लावला आहे. हा लॉकडाऊन किमान तीन आठवड्यांचा असेल. दुसरीकडे, इस्रायलमध्ये लसीकरण सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत वृद्ध, आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. ९० लाख लोकसंख्या असलेल्या इस्रायलमध्ये आतापर्यंत ४ लाखांहून जास्त रुग्ण आढळले असून ३२२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊनच्या नव्या नियमांनुसार, संध्याकाळी ५ ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत कोणीही आपल्या घरापासून १ किलोमीटरच्या क्षेत्राबाहेर जाऊ शकणार नाहीत. तथापि, ऑफिसमध्ये जाण्याची सवलत असेल. याचा अत्यावश्यक सेवेत समावेश केला आहे. रेस्तराँ व दुकाने बंद असतील तर होम डिलिव्हरी सुरू राहील. या लॉकडाऊनमुळे देशाचे दर आठवड्याला ६.८ हजार कोटींचे नुकसान होणार असल्याचे इस्रायली अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.

अमेरिकेमध्ये कोरोना रुग्णसंख्या पोहोचली 2 कोटींच्या उंबरठ्यावर
कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. आता अमेरिकेत या आठवड्यात रुग्णसंख्या २ कोटी होऊ शकते. तेथे आतापर्यंत एकूण १.९५ कोटी रुग्ण आढळले आहेत. सध्या दिवसाला सरासरी १.५ लाखापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. यानुसार तीन ते चार दिवसांत दोन कोटींचा आकडा पूर्ण होऊ शकतो. येथे कोरोनामुळे ३.४१ लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर १.१४ कोटी रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.अमेरिकेनंतर भारत आणि ब्राझीलमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत.

एक आठवड्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी रिलीफ पॅकेजला दिली मंजुरी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ९० कोटी डॉलरच्या (सुमारे ८.६ हजार कोटी रुपये) कोविड-१९ रिलीफ पॅकेजला मान्यता दिली. त्यांनी यावर रविवारी स्वाक्षरी केली. या पॅकेजमुळे कोरोना महामारीत अमेरिकेत बेरोजगारी गमावणाऱ्यांना मदत मिळणार आहे. एक आठवड्याच्या विलंबानंतर व चारही बाजूने असणाऱ्या दबावामुळे ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला. हे पॅकेज सुमारे १७ हजार कोटींच्या खर्च विधेयकाचा भाग आहे. या पॅकेजमध्ये वर्षाकाठी ७५,००० डॉलरपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना ६०० डॉलरचा चेक देण्याची तरतूद आहे.

ब्रिटनमध्ये आढळले ३० हजारांपेक्षा जास्त रुग्ण, रशियात ५५२ मृत्यू
- युरोपात कोरोना महामारीचा प्रकोप सुरूच आहे. रविवारी येथे ३०,५०१ रुग्ण आढळले, तर ३१६ जणांचा मृत्यू झाला.
- रविवारी युरोपमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू रशियात झाले. रविवारी येथे ५५२ जणांनी प्राण गमावले.
- दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या १० लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आढळल्यानंतर दररोज आढळणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...