आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नवीन टेस्टिंग किट:इस्रायलने फक्त 3800 रु. कोरोना किट बनवली, फुंकर मारून एक मिनटात सांगते तुम्ही पॉझिटिव्ह आहात की निगेटिव्ह 

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशाप्रकारे काम करते किट
Advertisement
Advertisement

इस्रायलच्या बेन-गुरियन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 'ऐसा इलेक्ट्रो-ऑप्टिकल' कोरोना टेस्ट किट तयार केली आहे. ही किट एक मिनिटात रिझल्ट सांगते. यामध्ये तपासणीसाठी नाक, घसा आणि फुक मारून सॅम्पल घेतले जाते. यावरून कोण कोरोना पॉझिटिव्ह आणि कोण विना लक्षण संक्रमित आहे हे समजते. ही किट 90 टक्के अचूक रिझल्ट देते असा संशोधकांचा दावा आहे. एका किटची किंमत फक्त 3800 रुपये आहे.

अशाप्रकारे काम करते किट 

संशोधकांनुसार, किटमध्ये विशेष प्रकारच्या सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. हे सेन्सर व्हायरस ओळखण्याचे काम करते. जेव्हा रुग्ण टेस्ट किटमध्ये तोंडाने हवा फुकतो, तेव्हा ड्रॉप्लेट्सच्या माध्यमातून व्हायरस सेन्सरपर्यंत पोहोचतो. या सेन्सरसोबत एक क्लाउड सिस्टम आहे. सेन्सर सिस्टमला विश्लेषण करून रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याविषयी सांगते.

या टेस्टसाठी लॅब असणे आवश्यक नाही 

संशोधकांनुसार, या टेस्ट किटची किंमत इतर पीसीआर टेस्ट किटपेक्षा कमी आहे. ही टेस्ट कुठेही केली जाऊ शकते, यासाठी लॅबची आवश्यकता नाही. एअरपोर्ट, स्टेडियम यासारख्या ठिकाणी ही टेस्ट किट उपयोगी ठरू शकते. 

एफडीएकडून अप्रूव्हल घेण्याची तयारी

संशोधक प्रोफेसर सारूसी यांच्यानुसार, ट्रायलच्या सुरुवातीपासूनच टेस्ट किटचा रिझल्ट चांगला दिसून आला आहे. या किटच्या मदतीने कमी वेळेत जास्त रुग्णांची तपासणी केली जाऊ शकते. ही किट लवकर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (एफडीए) कडून मंजुरी घेण्याची तयारी केली जात आहे.

Advertisement
0