आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्रायलमध्ये नवीन सरकार स्थापन झाले असून बेनेट नफ्ताली यांनी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली आहे. विशेष म्हणजे हे सरकार आठ पक्षाच्या युतीने तयार झाले आहे. यामध्ये सरकारकडे 60 खासदार तर विरोधी पक्षाकडे 59 खासदार आहे. त्यामुळे हे सरकार कितीकाळ टिकेल याबद्दल शंका उपस्थित केले जात आहे. कारण युतीमध्ये काही मतभेद झाले तर फटका बेनेट यांना बसणार आहे. बेनेट धर्मांध असून ते पॅलेस्टाईन राज्य विचारधारेला स्विकारत नाही. या सरकारचे वैशिष्टे म्हणजे या युतीमध्ये पहिल्यांदा अरब-मुस्लिम पक्षाचा (राम) समावेश आहे. तर दुसरीकडे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा पंतप्रधान पदाचा 12 वर्षाचा कार्यकाळ संपलेला आहे.
आकडेवारींचा विचार केल्यास सरकारच्या बाजूने 60 तर विरोधी पक्षाच्या बाजूने 59 खासदारांनी मतदान केले आहे. युती सरकारमध्ये सामील राम पक्षाचे एम के साद अल हारुमी हे मतदानाच्या दिवशी गैरहजर होते. त्यामुळे सरकार आणि विरोधी पक्षात फक्त एक सीटचा फरक आहे. बेनेट नेफ्ताली यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर माजी पंतप्रधान नेत्यानाहू यांनी त्यांना हातात हात घालून शुभेच्छा दिल्या.
संसदेत गदारोळ आणि घोषणाबाजी
'द टाईम्स ऑफ इस्त्रायल'च्या माहितीनुसार, रविवारी संसदेत मोठ्या प्रमाणात गदारोळ आणि घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान बेनेट हे भाषण देण्यासाठी उभे राहिले असताना विरोधकांनी खोटारडे आणि गुन्हेगार अशा शब्दांचा वापर केला. गोंधळ इतका होता की, पुढचे पंतप्रधान (सप्टेंबर 2023 नंतर) लॅपिड हे स्वतःच भाषण विसरले. बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, आज येथे जे काय घडत आहे ते पाहून इराणला खूप आनंद होत असेल. आज आपल्या देशासमोर अनेक धोके एकाचवेळी आले आहेत.
बेनेटची सर्वात मोठी समस्या
इस्रायली राजकारणातील अस्थिरता बर्याच वर्षांपासून दिसून येत आहे. यापूर्वी दोन वर्षात चार निवडणुका झाल्या पण कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. बेनेट नफ्ताली यांनी जरी पंतप्रधान होण्यासाठी युती केली असेल. परंतु, सध्याही लोक या सरकारबद्दल फारसे आशावादी नाहीत. कारण सरकारडे 60 खासदार तर विरोधी पक्षाकडे 59 खासदार आहेत. जर काहीही कारणांमुळे युती सरकारमध्ये मतभेद झाले तर हे सरकार कोसळेल आणि नंतर निवडणुका हा एकमेव मार्ग असेल.
महिला खासदारानी स्ट्रेचरवर येऊन मतदान केले
कामगार पक्षाच्या खासदार एमिली मोती यांना पाठीच्या कणाचा त्रास असल्याने त्या बऱ्याच दिवसापासून रुग्णालयात दाखल होत्या. दरम्यान, त्यांना रुग्णवाहिकेतून संसदेत आणण्यात आले. यानंतर त्यांनी स्ट्रेचरवरुनच युती सरकारच्या बाजूने मतदान केले. एमिली यांची दुखापत गंभीर असल्याने त्यांना उभे राहता येत नाही.
नेतान्याहू अजूनही शक्तिशाली
इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी 12 वर्ष पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली आहे. नवीन सरकारच्या सध्याच्या परिस्थितीवरुन त्यांच्यासाठी अजूनही सत्तेचे दरवाजे खुले आहेत. कारण नवीन सरकार बहुमतच्या दृष्टीने एकदम सीमेवर उभी आहे. जर काही कारणास्तव हे सरकार पडले. पहिला मार्ग - नवीन निवडणुका घ्यावा लागतील. दुसरा मार्ग - नेतान्याहूंनी पुन्हा बहुमत दाखवत सरकार स्थापन करतील.
आघाडीत सरकारमध्ये दोन पंतप्रधान असतील
आघाडी सरकारच्या अटींनुसार, यामीना पार्टीचे बेनेट नफ्ताली हे सप्टेंबर 2023 पर्यंत पंतप्रधानपदी असतील. त्यानंतर ते हे पद येर लॅपीडकडे यांच्याकडे जाईल. माजी पंतप्रधान नेतान्याहू याला सत्तेचा सौदा म्हणून संबोधत आहेत. परंतु, त्याच्याविरूद्ध भ्रष्टाचाराचे प्रकरण सुरू आहेत. परंतु, हे युती सरकार काही महिनेसुद्धा टिकू शकणार नाही असा आरोप नेत्यानाहू करीत आहे.
सरकार का बदलले?
इस्रायलमध्ये दोन वर्षांत चार वेळा निवडणुका झाल्या. परंतु, यामध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. इस्रायल संसदेत 120 जागा असूअन बहूमतांसाठी 61 जागा पाहिजेत. परंतु, येथे बहुपक्षीय प्रणाली असल्यामुळे छोटे पक्ष काही जागा जिंकतात. त्यामुळे कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवता येत नाही. नेत्यानाहू यांच्यासोबत हेच झाले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.