आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलकडे आहेत अण्वस्त्रे:माजी PM एहुद बराक यांचा सोशल मीडियावर खुलासा; जाणून घ्या, का लपवतो ज्यू देश ही बाब

तेल अवीव2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
एहुद बराक हे इस्रायलचे माजी पंतप्रधान आहेत. ते संरक्षण मंत्रीही राहिले आहेत. (फाइल) - Divya Marathi
एहुद बराक हे इस्रायलचे माजी पंतप्रधान आहेत. ते संरक्षण मंत्रीही राहिले आहेत. (फाइल)

भारत आणि पाकिस्तानसह जगातील 9 देशांकडे अण्वस्त्रे आहेत. इस्रायलचाही त्यात समावेश होतो. विशेष म्हणजे इस्रायलने कधीही सार्वजनिक व्यासपीठावर आपल्याकडे अण्वस्त्रे असल्याचे मान्य केले नाही किंवा ते नाकारलेही नाही.

'टाइम्स ऑफ इस्रायल'च्या वृत्तानुसार, इस्रायलच्या एखाद्या मोठ्या नेत्याने पहिल्यांदाच इस्रायलकडे अणुशक्ती असल्याची कबुली दिली आहे. माजी पंतप्रधान एहुद बराक यांनी हिब्रू भाषेत सोशल मीडियावर हा खुलासा केला आहे. येथे ते पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या देशातील न्यायालयीन सुधारणा आणि नागरिकांकडून होत असलेल्या विरोधाविषयी बोलत होते. दरम्यान, इस्रायलमध्ये हुकूमशाही आली तर त्याचा परिणाम अरब जगतावर आणि इस्रायलच्या अण्वस्त्रांवरही होईल, असेही त्यांनी लिहिले आहे. नंतर बराक यांनी हे ट्विट डिलीट केले.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू वेपन फॅसिलिटीतील शास्त्रज्ञांसह (फाइल).
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू वेपन फॅसिलिटीतील शास्त्रज्ञांसह (फाइल).

इशाऱ्या-इशाऱ्यात केला खुलासा

बराक यांनी सोशल मीडियावर देशातील न्यायालयीन सुधारणांवर भाष्य केले. म्हणाले- पाश्चिमात्य देशांचे राजकीय पक्ष इस्रायलबद्दल भाष्य करत आहेत. इस्रायलमध्ये लष्करी सत्तापालट होऊन हुकूमशाही आली, तर आखातात नवीन परिस्थिती निर्माण होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. काही लोक आमच्या अण्वस्त्रांचा संदर्भ देत असे म्हणत आहेत की यामुळे मुस्लिम जगताशी संघर्षाचा धोका वाढेल. तथापि, असे होईल असे मला वाटत नाही.

विशेष म्हणजे बराक यांनी इशाऱ्यातून हे सांगितले. आतापर्यंत इस्रायलकडे अण्वस्त्रे आहेत हे कोणत्याही इस्रायलच्या पंतप्रधान किंवा मंत्र्याने कधीही स्वीकारलेले नाही. बराक यांचे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जाऊ शकते, कारण पंतप्रधान असण्याव्यतिरिक्त ते संरक्षण मंत्रीही राहिले आहेत. त्यांनी 25 वर्षे इस्रायली हवाई दलात फायटर पायलट म्हणूनही काम केले आहे.

अण्वस्त्रांवर नजर ठेवणारी एजन्सी सिप्रीच्या म्हणण्यानुसार इस्रायलकडे जवळपास 90 ते 100 अण्वस्त्रे आहेत. दुसरीकडे, स्वतंत्र मीडिया रिपोर्ट्स आणि इस्रायल 365 ने अहवाल दिला की, ज्यू देशाकडे 200 ते 400 अण्वस्त्रे आहेत.

आतापर्यंत काय होते इस्रायलचे धोरण?

'इस्रायल 365' या वेबसाइटनुसार इस्रायलकडे 1948 पासून एकच धोरण आहे. जगासमोर अण्वस्त्रांचे अस्तित्व त्यांनी ना स्वीकारले, ना नाकारले. तथापि, प्रत्येकाला माहिती आहे की इस्रायलकडे बरीच धोकादायक आणि प्रगत अण्वस्त्रे आहेत.

एहुद बराक यांनी सप्टेंबर 2021 मध्येदेखील म्हटले होते की, आता आपली आण्विक स्थिती जगाला सांगण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शत्रू देशांवर दबाव निर्माण होऊ शकतो. अखेर याप्रकरणी आमचे कोणतेही पारदर्शक धोरण का नाही?

बराक यांच्या वक्तव्यानंतर इस्रायल अडचणीत आले आहे. देशाचे सुप्रसिद्ध संरक्षण तज्ज्ञ निऑन एम्ब्रिच म्हणाले - या माणसाने खूप भयंकर चूक केली आहे. वेळ न गमावता त्याला अटक करावी. नेतान्याहूंचा राजकीय विरोध होऊ शकतो, पण आपण आपला देश कसा बांधला आणि वाचवला? त्यासाठी बराक यांनी इतिहास वाचावा.

इस्रायल सत्य का सांगत नाही?

 • इस्रायल आणि अमेरिका यांच्यात खूप घट्ट मैत्री किंवा भावासारखे नाते आहे. मानवजातीच्या इतिहासात आतापर्यंत अणुबॉम्बचा वापर युद्धात एकदाच झाला आहे. हे अमेरिकेने जपानविरुद्ध केले होते. त्यानंतर हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर बॉम्ब टाकण्यात आले.
 • न्यूज एजन्सी एएनआय आणि सहयोगी एजन्सी टीपीएसच्या मते, इस्रायलने कधीही अण्वस्त्रे आहेत हे जगासमोर का मान्य केले नाही आणि तेही एक-दोन नव्हे तर शंभरच्या आसपास अण्वस्त्रे? हा प्रश्न आहे. असे असूनही, इस्रायलने आपण अणुशक्ती असल्याचे कधीच मान्य केले नाही, तर त्याची दोन कारणे आहेत.
 • पहिले- जर इस्रायलकडे अण्वस्त्रे आहेत हे मान्य केले तर त्यांना नॉन-प्रोलिफिरेशन ट्रीटी वा NPT (Nuclear Non-proliferation Treaty) वर स्वाक्षरी करावी लागेल. कदाचित अण्वस्त्रे लपवण्याच्या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर काही निर्बंधही लादले जातील.
 • दुसरे- पहिल्यापासून कारणापासून अमेरिका वाचवेल, पण दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि यामुळेच इस्रायलकडे अण्वस्त्रे आहेत हे कधीही मान्य करत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इस्रायलला आपले अण्वस्त्र केंद्र आंतरराष्ट्रीय तपासणीसाठी उघडावे लागेल.

हिरोशिमावर टाकण्यात आला अणुबॉम्ब

जगात सर्वप्रथम 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आला. आपल्या लांब व सडपातळ आकारामुळे या शहरावर टाकण्यात आलेल्या बॉम्बला 'लिटिल बॉय' असे नाव देण्यात आले होते. त्यात 35 किलो यूरेनियम 235 चा वापर करण्यात आला होता. त्यातून 15 हजार टन टीएनटी स्फोट झाला. त्यात 70 हजार लोकांचा जागीच मृत्यू झाला. तर किर्णोत्सारामुळे जखमी झालेल्या आणखी 76 हजार लोकांचा पुढील काही महिन्यांत मृत्यू झाला.

नागासाकीवर दुसरा अणुहल्ला

नागासाकीवर टाकण्यात आलेला अणुबॉम्ब हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या बॉम्बपेक्षा थोडा मोठा होता. त्यामुळे त्याला 'फॅट मॅन' असे नाव देण्यात आले होते. त्यात मॅटेरियर म्हणून प्ल्युटोनियम 239 चा वापर करण्यात आला होता. प्ल्युटोनियम 239 च्या न्यूक्लियर फिजनमुळे झालेल्या या अणुस्फोटातून 21 हजार टन टीएनटीचा धमाका झाला. या बॉम्बमुळे जवळपास 40 हजार लोकांचा बळी गेला. तर रेडिएशनमुळे जखमी झालेल्या जवळपास 30 हजार लोकांचा पुढील काही महिन्यांत बळी गेला.

​​​​लक्षावधी लोकांचा बळी घेऊ शकतो अणुबॉम्ब

अण्वस्त्रे पृथ्वीवरील सर्वात संहारक शस्त्रे आहेत. ते लाखो लोकांचा अवघ्या काही सेकंदांत बळी घेऊन संपूर्ण शहर उद्ध्वस्त करु शकतात. त्याचे परिणाम पर्यावरण व येणाऱ्या पीढ्यांनाही भोगावे लागतात. यामुळे पृथ्वीचे अस्तित्वच संकटात येऊ शकते.

 • अण्वस्त्रांच्या स्फोट झालेल्या ठिकाणचे तपमान कोट्यवधी अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. यामुळे व्यक्तीची अक्षरशः वाफ होऊन जाते.
 • एखाद्या इमारतीत आश्रय घेतलेले लोकही या स्फोटामुळे निर्माण झालेल्या शॉक व्हेव व उष्णतेमुळे मारले जातात. कारण, इमारती भूईसपाट होतात व त्यातील सर्वच ज्वलनशील पदार्थही आपसूकच पेट घेतात.
 • भूमिगत ठिकाणी आश्रय घेणाऱ्या काही व्यक्ती सुदैवाने या हल्ल्यातून वाचतात. पण, बहुतांश जणांचा वातावरणातील ऑक्सिजन संपल्यामुळे तडफडून मृत्यू होतो.
 • स्पष्ट सांगायचे झाले तर अणु हल्यात व्यक्ती कुठेही लपला तरी तो वाचणे जवळपास अशक्यप्राय असते. त्यानंतरही कुणी वाचले तर त्यांना आयुष्यभर मरण यातना भोगाव्या लागतात.
 • अणु स्फोटांच्या किर्णोत्सारामुळे कँसरचा धोका वाढतो. स्फोट झालेल्या ठिकाणी सलग 20 वर्षांपर्यंत अपंग मुले जन्माला येतात. तिथे वृक्षसंपदा फुलत किंवा बहरत नाही किंवा पीकपाणीही येत नाही.
 • अण्वस्त्रांचा पर्यावरण व हवामानालाही अत्यंत वाईट फटका बसतो. रेड क्रॉसच्या मते, अणु युद्धामुळे जगातील 1 अब्ज लोकसंख्येवर उपासमारीचे संकट येऊ शकते.