आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्षात शांतता:इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये इजिप्तने घडविला युद्धविराम; हिंसाचारात 33 पॅलेस्टिनी ठार, इस्लामिक जिहादने डागले हजार रॉकेट

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इजिप्तने इस्रायल आणि पॅलेस्टाईनची इस्लामिक जिहाद संघटना यांच्यात युद्धविराम घडवून आणला आहे. आठवडाभर चाललेल्या हिंसाचारात 12 नागरिकांसह 33 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला. त्याचवेळी इस्लामिक जिहाद संघटनेने इस्रायलवर एक हजारहून अधिक रॉकेट डागले होते. त्यामुळे अनेक इस्रायलींना बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला. शनिवारी माहिती देताना इजिप्शियन टीव्ही चॅनल अल-काहेरा यांनी सांगितले की, रात्री 10 वाजल्यापासून युद्धविराम लागू झाला.

इस्रायलच्या संरक्षण दलाने गाझामधील 158 हून अधिक इस्लामिक जिहाद ठिकाणांना लक्ष्य केले.
इस्रायलच्या संरक्षण दलाने गाझामधील 158 हून अधिक इस्लामिक जिहाद ठिकाणांना लक्ष्य केले.

जोपर्यंत इस्रायल हल्ला करत नाही, तोपर्यंत आम्ही शांत राहू
युद्धबंदीबाबत पॅलेस्टाईनच्या इस्लामिक जिहाद संघटनेने सांगितले की, आम्ही या युद्धविरामाचे पालन करण्याची घोषणा करतो. जोपर्यंत इस्रायलवर हल्ला होत नाही तोपर्यंत ते स्वीकारणार आहे. इस्रायलने हल्ला केला तर आम्ही शांत बसणार नाही. इस्रायलच्या सैन्याने अल्जझीराला सांगितले की, ते युद्धविरामाचे मुल्यांकन करत आहेत. यात पंतप्रधान नेतन्याहू आणि संरक्षण मंत्री योव गॅलांट देखील उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान लष्कराचे गुप्तचर अधिकारी या दोघांना परिस्थितीची संपूर्ण माहिती देतील.

इस्रायलच्या हवाई हल्ल्याने हिंसाचार सुरू झाला

मंगळवारी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इस्लामिक जिहादचे 3 शीर्ष कमांडर मारले गेले. यानंतर प्रत्युत्तरादाखल पॅलेस्टाईनकडून सतत रॉकेट डागण्यात आले. यामध्ये इस्लामिक जिहादच्या लढवय्यांशिवाय सर्वसामान्यांनाही जीव गमवावा लागला. अनेक घरांचीही पडझड झाली. त्याचवेळी इस्लामिक जिहादने डागलेल्या रॉकेटमध्ये 80 वर्षीय इस्रायली महिलेचाही मृत्यू झाला.

चित्रात PIJ चा क्षेपणास्त्र कमांडर अली हसन (उजवीकडे) आणि ज्या इमारतीवर हल्ला झाला होता. ती इमारत (डावीकडे) दाखवली आहे.
चित्रात PIJ चा क्षेपणास्त्र कमांडर अली हसन (उजवीकडे) आणि ज्या इमारतीवर हल्ला झाला होता. ती इमारत (डावीकडे) दाखवली आहे.

काय आहे पॅलेस्टाईनची इस्लामिक जिहाद संघटना
पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद संघटना 1981 मध्ये तयार झाली. त्याची सुरुवात इजिप्तमध्ये शिकणाऱ्या पॅलेस्टिनी मुलांनी केली होती. त्याला वेस्ट बँक, गाझा आणि इस्रायलच्या ताब्यातील पॅलेस्टाईनचा ताबा हवा आहे. इस्रायल या संघटनेला इराणचा सहयोगी म्हणतो. ज्यांना इस्रायलचा नाश करायचा आहे. पॅलेस्टाईनला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या इतर मोठ्या संघटनांच्या तुलनेत इस्लामिक जिहाद संघटना लहान आहे. त्याला इराणकडून निधी मिळतो.

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये संघर्ष का आहे?
मध्यपूर्वेतील या भागात किमान १०० वर्षांपासून हा संघर्ष सुरू आहे. वेस्ट बँक, गाझा पट्टी आणि गोलन हाइट्स या भागांवरून वाद सुरू आहे. या भागांसह पूर्व जेरुसलेमवर पॅलेस्टाईनचा दावा आहे. त्याचवेळी इस्रायल जेरुसलेमवरील आपला दावा सोडायला तयार नाही.

गाझा पट्टी हा इस्रायल आणि इजिप्त यांच्यामध्ये आहे. त्यावर सध्या हमासचा ताबा आहे. हा इस्रायल विरोधी गट आहे. सप्टेंबर 2005 मध्ये इस्रायलने गाझा पट्टीतून आपले सैन्य मागे घेतले. 2007 मध्ये इस्रायलने या भागावर अनेक निर्बंध लादले होते. पॅलेस्टाईनने वेस्ट बँक आणि गाझा पट्टीमध्ये स्वतंत्र पॅलेस्टिनी राज्य स्थापन करण्याची मागणी केली आहे.