आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायल-पॅलेस्टाइन वाद:बंडखोरांनी 1050 रॉकेट डागले, इस्रायलने 850 आकाशातच पाडले

तेल अवीवएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इस्रायलकडे अदृश्य कवच ‘आयर्न डोम’चे संरक्षण

इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील वाद युद्धाच्या दिशेने जात आहे. दोघांमध्ये हवाई हल्ले होत आहेत. या हल्ल्यात तडाख्यात येऊन १२ लहान मुलांसह ५९ जणांनी प्राण गमावले. ३०० जण जखमी झाले आहेत. २०१४ नंतर इस्रायलवरील हा सर्वात मोठा रॉकेट हल्ला आहे.

इस्रायली माध्यमांनुसार, हमासने(इस्रायलच्या दृष्टीने दहशतवादी संघटना) सोमवारपासून बुधवारपर्यंत सुमारे ४० तासांत १०५० क्षेपणास्त्र डागले. यापैकी ८५० पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे त्यांची संरक्षण प्रणाली आयर्न डोमने हवेतच पाडली. सुमारे २०० क्षेपणास्त्रे इस्रायलच्या रहिवासी क्षेत्रात पडले. यामुळे बरेच नुकसान झाले. आयर्न डोममुळे सुरक्षित असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. इस्रायलने तेल अवीवच्या चहुबाजूने ५ आयर्न डोम लावले आहेत. हे क्षेपणास्त्राची ओळख पटवून पाडते. एका डोमची किंमत ३४० कोटी रु. आहे.

शत्रूच्या नायनाटापर्यंत हल्ले थांबवणार नाही
इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गँट्सनी बुधवारी सांगितले, आमचे लष्कर गाझा पट्टी आणि पॅलेस्टाइनमधील हल्ले बंद करणार नाही. शत्रूला पूर्ण शांत करत नाही तोवर आम्ही थांबणार नाही. त्यानंतरच शांततेसाठी चर्चा होईल. इस्रायल आता दीर्घावधीपर्यंत शांतता कायम राखण्याचा उपाय करेल.

  • अमेरिकेच्या मदतीने २०११ मध्ये सक्रिय
  • आयर्न डोम अमेरिकेच्या आर्थिक व तांत्रिक मदतीने २०११ मध्ये सक्रिय झाले होते.
  • आयर्न डोम फायटर प्लेनमधून डागली जाणारी क्षेपणास्त्रे व ड्रोन्सचा निशाणा साधू शकते.
  • या आयर्न डोमचा सक्सेस रेट ८० ते ९०% आहे. तज्ज्ञांनुसार, हे १००% विश्वासार्ह नाहीत.
बातम्या आणखी आहेत...