आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता शाब्दिक हल्ले:इस्रायल PM म्हणाले- युद्ध आम्ही सुरु केले नाही, आमच्यावर 4 हजार रॉकेट हल्ले झाले, हमासने म्हटले- हे युद्ध इस्रायल हरले

तेल अवीव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात 11 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध शुक्रवारी थांबले. हमासने पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टी भागातून इस्रायलवरील रॉकेट हल्ले थांबवले आहेत. इस्रायली हवाई दलानेही गाझावरील बॉम्ब हल्ले थांबवले आहेत. परंतु, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले गेले आहे की, अल इक्सा मशिद कंपाऊंडमध्ये इस्रायली पोलिस आणि पॅलेस्टाईन यांच्यात चकमकी झाल्या.

मात्र, युद्ध संपल्यानंतर आता दोन्ही बाजूंनी शाब्दिक हल्ले सुरु झाले आहेत. म्हणूनच रॉकेट आणि बॉम्बचा आवाज थांबल्यानंतरही तणाव कायम आहे. तथापि, युद्धबंदी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या अमेरिका आणि इजिप्तने दोन्ही देशांना सांभाळून बोलण्याची सूचना केली आहे.

काय म्हणाले इस्रायलचे पंतप्रधान
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शुक्रवारी संध्याकाळी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले- आम्ही युद्ध सुरू केले नाही. काहीही कारण नसताना हमासने इस्रायलवर 4 हजार रॉकेट हल्ले केले. या परिस्थितीत कोणताही देश शांत राहू शकत नाही आणि आम्हीही वेगळे नाही. आयरन डोमद्वारे आम्ही स्वतःचे रक्षण केले. जर ते नसते तर आम्हाला जमिनी कारवाई करावी लागली असती आणि यामुळे दुसर्‍या बाजूला बरेच नुकसान झाले असते.

बायडेन यांचे आभार मानले
एका प्रश्नाच्या उत्तरात नेतन्याहू म्हणाले- अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि इतर जागतिक नेत्यांनी इस्रायलची साथ दिली. याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. या नेत्यांनी जगाला हा संदेश दिला आहे की, लोकशाहीच्या माध्यमातून कसे पुढे जाता येते आणि दहशतवादी मृत्यूवर कसे विजय साजरे करतात. भविष्यासाठी हा आपल्यासमोर एक धडा आहे.

हमासने केला विजयाचा दावा
नेतन्याहू यांची प्रतिक्रिया साधीसरळ होती. दुसरीकडे, हमासचे राजकीय प्रमुख इस्माईल हनियाचा सूर कडक होता. एका निवेदनात ते म्हणाले- या युद्धात आम्ही वेदना सहन करूनही इस्रायलला युद्धात पराभूत केले आहे. याचा परिणाम इस्रायलच्या भविष्यावर होईल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे युद्धबंदीसाठी त्यांनी इजिप्तचे आभार मानले परंतु अमेरिकेचा उल्लेखही केला नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हनियाने हमासला शस्त्रे दिल्याबद्दल इराणचे कौतुक केले.

हनियाच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात पॅलेस्टाईन आणि हमास दोघांनाही त्रास होऊ शकतो. कारण, इराण नेहमीच आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे अमेरिका आणि इस्रायलच्या निशाण्यावर राहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...