आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Israel Palestine Updates | Israel Palestine Conflict Turns Intense In Gaza Strip Hamas Fires Multiple Rockets

पुन्हा इस्रायल विरुद्ध पॅलेस्टीनी संघर्ष:इस्रायलचे पॅलेस्टाइनवर हवाई हल्ले, 13 मजली इमारत जमीनदोस्त; हमासने 300 रॉकेट डागल्यानंतर प्रत्युत्तरात कारवाई

तेल अवीवएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इस्रायल एअरफोर्सकडून प्रत्युत्तर

इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे. पॅलेस्टाइनची प्रतिबंधित संघटना हमासकडून इस्रायलची राजधानी तेल अवीव आणि एश्केलोनसह होलोन शहरावर रॉकेट हल्ले करण्यात आले. रात्री उशीरा झालेल्या या हल्ल्यांमध्ये एका भारतीयासह 3 नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले.

इस्रायलने सांगितल्यानुसार, हमासच्या ताब्यात असलेल्या एका इमारतीवर हल्ला करण्यात आला. या इमारतीत हमालच्या पॉलिटिकल विंगचे ऑफिस होते. ही इमारत आता जमीनदोस्त झाली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षण मंत्री बेनी गँट्झ यांनी इशारा दिला की, हमासला या हल्ल्याची मोठी किंमत मोजावी लागेल. रविवारपासून सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत 38 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी, 2014 मध्ये इस्राइल आणि हमासदरम्यान हिंसक संघर्ष झाला होता.

भारतीय महिलेचा मृत्यू
हमासच्या रॉकेट हल्ल्यात भारतीय महिला सौम्या संतोष (32) यांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी-बुधवारी रात्री ‘टाइम्स ऑफ इस्राइल’ च्या हवाल्याने वृत्तसंस्थांनी ही माहिती दिली. सौम्या तिथे नोकरी करत होती. त्याच्या कुटुंबात 9 वर्षीय मुलगा आणि पती आहे. भारतात इस्रायलचे एम्बेसेडर रॉन माल्कांनी सौम्याच्या निधनाची पुष्टी केली.

हमासकडून प्रतिक्रिया नाही
‘टाइम्स ऑफ इस्राइल’ शी बातचीतमध्ये हमासच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी 130 रॉकेट इस्रायलकडे हल्ले करण्यात आले. 24 तासांत ही संख्या 300 पर्यंत पोहोचली. इस्रायली हल्ल्यांत किती हानी झाली यावर हमासकडून काहीच सांगण्यात आले नाही. इस्रायलने एका 13 मजली इमारतीला जमीनदोस्त केले. यात शेकडो लोक होते. याच इमारतीमध्ये हमासचे राजकीय कार्यालय होते असा दावा इस्रायलने केला आहे. इस्रायलने पॅलेस्टाइनच्या इतर अनेक मोठ-मोठ्या इमारतींना सुद्धा लक्ष्य केले आहे. यात किती नागरिकांचा किंवा हमासच्या सदस्यांचा मृत्यू झाला, त्याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. इस्रायलने हमासला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. तर पॅलेस्टाइनमध्ये या संघटनेचे राजकीय वर्चस्व आहे.

बातम्या आणखी आहेत...