आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा अतिरेकी हल्ला झाला. त्यात एका कारने अनेक पादचाऱ्यांना चिरडले. त्यात इटलीच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर 7 जण जखमी झाले. टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, कारच्या ड्रायव्हरने गोळीबारही केला. इस्रायलमध्ये 12 तासांत होणारी अशी दुसरी घटना आहे. तत्पूर्वी, शुक्रवारी दुपारी वेस्ट बँकमध्ये गोळीबार झाला. त्यात 2 ब्रिटीश महिलांचा मृत्यू झाला.
शुक्रवारी रात्री उशिरा कॉफमॅन स्ट्रीटमध्ये कारने नागरिकांना धडक मारली. त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एका व्हिडिओत वेगवान कार रस्त्याच्या कडेने चालाऱ्या लोकांना धडक देताना दिसून येते. त्यानंतर काही अंतर गेल्याने उलटते. यावेळी गोळीबाराचाही आवाज ऐकू येतो.
पोलिसांनी हल्लेखोराला ठार मारले
इस्रायलची माध्यमांच्या माहितीनुसार, पोलिसांनी हल्लेखोराला ठार मारले. सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या एका व्हिडिओत दिसून येत आहे की, उलटलेल्या कारमधून एक व्यक्ती बाहेर येऊन पोलिसांवर गोळीबार करतो.
एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय युसूफ अबु जबर असे हल्लेखोराचे नाव आहे. त्याने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या पादचाऱ्यांना कारखाली चिरडले. त्यानंतर त्याने गोळीबारही केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत तो ठार झाला.
प्रत्यक्षदर्शीने सांगितले - 3-4 गोळ्यांचा आवाज आला
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले - मी रस्ता ओलांडत होते तेव्हा पांढऱ्या रंची कार अत्यंत वेगात येताना दिसली. ती माझ्या जवळून गेली आणि अचानक तिने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या लोकांना धडक दिली. मला वाटले हा हिट अँड रनचा प्रकार आहे. मी प्राण वाचवण्यासाठी धावत एका पार्किंग लॉटमध्ये लपले. अन्य एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले - मी घराच्या बाल्कनीत उभी होते. तेव्हा एक मोठा आवाज आला. 3-4 गोळ्यांचाही आवाज आहे. मी लोकांना खाली पडताना पाहिले.
जखमींत इटालियन व ब्रिटीश पर्यटक
शुक्रवारी रात्री झालेल्या या घटनेत ठार झालेल्या इटालियन व्यक्तीचे नाव एलेसेंड्रो परिणी असे आहे. तो रोमचा होता. या अपघाता 7क इटालियन व ब्रिटीश नागरिकही जखमी झालेत. इटलीचे पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी यांनी परिणीच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी तेल अवीव येथील ही घटना भ्याड हल्ला असल्याचेही म्हटले आहे.
अल-अक्सा मशिदीतील वादानंतर हिंसाचार
इस्रायलच्या अल-अक्सा मशिदीत झालेल्या वादापासून हिंसाचार वाढला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...
5 एप्रिल रोजी इस्रायलच्या जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीत पोलिस व पॅलेस्टिनींत चकमक झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, काही पॅलेस्टिनी फटाके, लाठ्या व दगडांसह मशिदीच्या आत लपले होते. त्यांनी मशिदीबाहेर बॅरिकेड्स लावले होते. त्यानंतर त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना मशिदीत प्रवेश करावा लागला. पोलिसांनी कारवाई करून काहींना अटक केली. त्यांच्यावर पवित्र मशिदीची तोडफोड केल्याचा आरोप आहे.
हल्ल्यानंतर काही वेळातच प्रत्युत्तरादाखल गाझा पट्टीतून इस्रायलवर 9 रॉकेट डागण्यात आले. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. पण हा हल्ला हमास दहशतवादी संघटनेने केल्याचे मानले जात आहे. इस्रायली सैन्याच्या माहितीनुसार, त्यांनी 5 रॉकेट पाडले, तर उर्वरित मोकळ्या मैदानात पडले.
7 एप्रिल रोजी सकाळी इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ला केला. हवाई हल्ल्यात 2 बोगदे व 2 शस्त्रांचे कारखाने उद्ध्वस्त केल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण दलाने केला. या ऑपरेशनला 'द स्ट्राँग हँड' असे नाव देण्यात आले. त्यानंतर दुपारी गाझाच्या अतिरेक्यांनी वेस्ट बँकमध्ये गोळीबार केला. त्यात 2 ब्रिटिश महिलांचा मृत्यू झाला होता.
अल-अक्सा मशिद मुस्लिमांचे तिसरे सर्वात पवित्र स्थळ
मक्का-मदिनानंतर अल-अक्सा मशीद मुस्लिमांचे तिसरे पवित्र स्थळ आहे. ती हरम अल-शरीफ (टेम्पल माउंट) च्या परिसरात बांधण्यात आली आहे. ही जगातील दुसरी सर्वात जुनी मशीद आहे. या मशिदीत 4 लाख लोक एकत्र नमाज पठण करू शकतात. ज्यू लोक ही मशीद आपले मंदीर असल्याचा दावा करतात. त्यामुळे येथे नेहमीच वाद होतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.