आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर...:इस्रायल पहिला मास्कमुक्त देश, 6 लाख मुलांनाही कोराेनाची लस दिली

तेल अवीव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इस्रायल जगातील पहिला देश, जेथे ८५% लोकांचे लसीकरण, बंदिस्त ठिकाणी मास्कची सक्तीही हटवली

कोरोना काळात बंदिस्त ठिकाणी मास्क घालण्याची सक्ती मागे घेणारा इस्रायल जगातील पहिला देश झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी ही सक्ती मागे घेतली. मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोना रुग्णांची घटती संख्या बघून हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालण्याची आधीच सूट देण्यात आली आहे. आता फक्त मोजक्याच लोकांना मास्क घालण्याची गरज असेल. यात कोरोनाची लस न घेणारे कर्मचारी व वृद्धाश्रमात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तसेच विमान प्रवास आणि क्वॉरंटाइन दरम्यान मास्क घालावा लागेल. जे लोक रुग्णालयात वा नर्सिंग होममध्ये दाखल आहेत त्यांनाही मास्क घालावा लागेल. सध्या मंत्रालयाने शाळांसाठी कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. शाळांमध्ये मास्क सक्ती कायम राहील असे आधी सांगितले जात होते. देशात मागील आठवड्यापासून १२ ते १५ वर्षांच्या मुलांचे कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. सुमारे सहा लाख मुलांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.

५० दिवसांत जगात कोरोना रुग्ण घटले : डब्ल्यूएचओ
गेल्या ५० दिवसांत जगात कोरोनाची प्रकरणे घटली आहेत. डब्ल्यूएचओने सांगितले, कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंतही घट झाली आहे. गेल्या दीड वर्षात पहिल्यांदाच कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याचे बघायला मिळाल्याने ही माहिती विशेष आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टॅड्रॉस अॅडहेनॉम घेबरेयेसस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ब्रिटनमध्ये ४४%, अमेरिकेत ४३% प्रौढांचे लसीकरण

वृत्तानुसार ३२.८५ कोटी लोकसंख्येचा अमेरिका ४३.७ टक्के, ६.७० कोटी लोकसंख्येचा ब्रिटन ४४ टक्के, ८.४ कोटी लोकसंख्येचा जर्मनी २६.३ टक्के व ३.९ कोटी लोकसंख्येच्या पोलंडने २५.७ टक्के लोकांचे लसीकरण केले आहे. तर १४० कोटी लोकसंख्येच्या भारतात आतापर्यंत ३.५% लोकांचेच लसीकरण होऊ शकले आहे.

९२ लाख लोकसंख्येच्या देशात काेरोनाचे २३१ रुग्ण
वृत्तानुसार ९२ लाख लोकसंख्येच्या इस्रायलमध्ये आतापर्यंत ८५% प्रौढांचे लसीकरण झाले आहे. असे करणारा इस्रायल पहिला देश आहे. दुसरीकडे सध्या कोरोनाचे फक्त २३१ सक्रिय रुग्ण आहेत. २४ तासात फक्त २४ रुग्ण आढळले. १५ ते २० दिवसांत इस्रायल कोरोनामुक्त होईल, असा दावा केला जात आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना कोरोना चाचणी सक्तीची आहे.

जगात २४ तासांत ३ लाख रुग्ण; हा आकडा ८५ दिवसांत सर्वात कमी

सोमवारी जगभरात ३ लाख ३४७ लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह अाला. या दरम्यान ६६७२ जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला. रोजच्या मृत्यूचा हा आकडा गेल्या ८५ दिवसांतील सर्वात कमी आहे. या आधी २१ मार्चला ६२९८ जणांचा मृत्यू झाला होता. जगात आतापर्यंत १७.७० कोटी जण कोरोना बाधित झाले आहेत. ३८.२७ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...