आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाझा:इस्रायलच्या हवाई हल्ल्यात आंतरराष्ट्रीय मीडियाचे कार्यालय उद्ध्वस्त, 10 हजार लोकांचे पलायन

तेल अवीवएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र गाझा पट्टयातील एका वस्तीचे. - Divya Marathi
छायाचित्र गाझा पट्टयातील एका वस्तीचे.
  • युद्ध थांबल्यानंतरही 2-3 वर्षांनंतर पुन्हा होतात हल्ले

इस्रायलने शनिवारी हवाई हल्ला करून गाझा येथील १३ मजली इमारत उद्ध्वस्त केली. त्यात अमेरिका व कतारच्या मीडिया हाऊससह अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांच्या कार्यालयांचा समावेश होता. हल्ल्याच्या एक तास आधी इस्रायलच्या सैन्याने घोषणा करून लोकांना इमारत तसेच परिसर सोडण्याची सूचना केली. त्याच्या एका तासानंतर इस्रायलच्या लढाऊ विमानांतून बाॅम्बवर्षाव सुरू झाला. काही सेकंदांत १३ मजली इमारत नेस्तनाबूत झाली. इस्रायल व हमास यांच्यातील युद्धात सुमारे १६० जणांचा मृत्यू झाला. मृतांत ३१ मुलांचाही समावेश आहे. गाझापासून १० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी जावे लागले.

इस्रायल : बलाढ्य संरक्षण यंत्रणा, रणगाडे, क्षेपणास्त्रेही
रणगाडे-३५०१, पाणबुडी-३, जेरिको क्षेपणास्त्रे-१४०० मारक क्षमता. जेरिको-२-२८०० किमी, जेरिको-३-५६०० किमी), ४६० युद्ध क्षमतेची विमाने.

हमास: १८० किमी अंतरावर हल्ल्यास सक्षम शस्त्रे
१२२ एमएम रॉकेट, फजर ५ (७५ किमी), जे-८० (८0 किमी), जे-९० (९० किमी), ए-१२० (१२० किमी), आर-१६० (१६० किमी), एम-३०२ (१८० किमी)

गेल्या १० वर्षांतील स्थिती, पॅलेस्टाइनने मोजली

१३ वर्षांत इस्रायलमध्ये २५० मृत्यू, पॅलेस्टाइनमध्ये २२ पट जास्त
जेरुसलेममध्ये इस्रायली पोलिस व पॅलेस्टाइन यांच्यातील संघर्ष युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचलाय. हमासचे ताजे हल्ले आणि इस्रायलची कारवाई यात १२० हून जास्त लोक ठार झाले. गेल्या १३ वर्षांत इस्रायलमध्ये २५० लोकांचा मृत्यू झाला. ५६०० हून जास्त लोक जखमी झाले. पॅलेस्टाइनमधील मृतांचे प्रमाण २२ पट (५७३३) जास्त आहे. १.२० लाख जखमी झाले.

पाच महिन्यांचे बाळ ढिगाऱ्याखाली सुरक्षित
पाच महिन्यांचे बाळ ढिगाऱ्याखाली सुरक्षित

कुटुंबातील १० सदस्यांचा मृत्यू, पाच महिन्यांचे बाळ ढिगाऱ्याखाली सुरक्षित
शुक्रवारी रात्री इस्रायलच्या हवाई दलाने गाझातील स्थलांतरितांची छावणी नष्ट केली. त्यात एकाच कुटुंबातील १० लोकांचा मृत्यू झाला. येथील ढिगाऱ्याखालून ५ महिन्यांचे बाळ मात्र सुखरूप बाहेर काढण्यात आले. शनिवारी हल्ल्याच्या १४ तासांनंतर ढिगारा हटवण्यात आला. तेव्हा बाळाचा श्वास सुरू असल्याचे लक्षात आले. त्याला जखमा झाल्या असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पॅलेस्टाइनमध्ये यंदा जखमींचे प्रमाण ७८ टक्के जास्त
ताज्या संघर्षातदेखील सर्वाधिक फटका पॅलेस्टाइनला बसत आहे. तेथे यंदाच्या संघर्षातील जखमींची संख्या इस्रायलच्या तुलनेत ७८ पटीने जास्त आहे.

बातम्या आणखी आहेत...