आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'द कश्मीर फाइल्स' चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलन यांना देश सोडण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्यांनी शनिवारी याबाबत ट्विटरवर माहिती दिली. पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉट मध्ये त्यांना देश सोडण्याची धमकी देण्यात आलेली आहे.
ज्या पोस्टमध्ये लिहले आहे की, 'हिटलर महान होता, ज्याने तुमच्या सारख्या लोकांना जाळले आहे. ताबडतोब भारत सोडा' असा संदेश लिहलेला होता. धमकी देणाऱ्याची सुरक्षा लक्षात घेऊन राजदूत गिलन यांनी त्या व्यक्तीची ओळख लपवित असल्याचे म्हटले आहे.
सेमिटिझम आजही अस्तित्वात आहे : गिलन
या पोस्टवर भारतीयांनी इस्रायलच्या राजदूताला पाठिंबा दिला आहे. गिलन यांनी आणखी एका ट्विटमध्ये भारतातील जनतेचे आभार मानले आहेत. त्याने सांगितले की, शेवटच्या पोस्टवर मला भारताकडून खूप पाठिंबा मिळत आहे, यामुळे मला खूप चांगले वाटते. तो मेसेज शेअर करण्यामागचा उद्देश एवढाच होता की, आजही लोकांमध्ये ज्यूविरोधी भावना आहेत. याला सर्वांनी मिळून विरोध केला पाहिजे.
काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित चित्रपट
'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट 1990 मध्ये काश्मीर खोऱ्यातील काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि स्थलांतरावर आधारित होता. जे 11 मार्च 2022 रोजी रिलीज झाले. यामध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी आणि मिथुन चक्रवर्ती या स्टार्सनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. काश्मीर फाईल्सने चांगला व्यवसाय केला.बॉक्स ऑफिसवर 290 कोटींहून अधिक कमाई केली.
पीएम मोदींनी चित्रपटाचे कौतुक केले
भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी चित्रपटाचे कौतुक केले होते. असे चित्रपट बनत राहीले पाहीजेत. असे ते म्हणाले होते. त्यांच्या माध्यमातून सत्य समोर येते. चित्रपटात दाखवण्यात आलेले काश्मीरचे सत्य दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येकजण भाषण स्वातंत्र्याबद्दल बोलतो. आणीबाणीसारखी मोठी घटना या देशात घडली, पण त्यावर चित्रपट बनला नाही. कारण सत्य सांगण्याचा सतत प्रयत्न होत नव्हता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.