आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंतराळातील विविध रहस्यांवरुन पडदा दूर करणाऱ्या संशोधकांनी आता तब्बल 9 अब्ज वर्षांपासून सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या एका महाकाय ब्लॅकहोल अर्थात कृष्णविवराचा शोध लावला आहे. हे कृष्णविवर प्रतिसेकंद पृथ्वीएवढ्या आकाराने विस्तीर्ण होत आहे. त्याचेही वस्तुमानही सूर्यापेक्षा तब्बल 3 अब्ज जास्त आहे. ऑस्ट्रेलियन संशोधकांच्या मते, नवे कृष्णविवर अंधाऱ्या क्षेत्रात दुर्बिणीच्या मदतीने सहजपणे पाहता येईल.
50 वर्षांपासून सुरु होते संशोधन
हे संशोधन arXiv नियतकालिकात प्रकाशित झाले होते. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, एका विशिष्ट प्रकारच्या ताऱ्याचा शोध घेत असताना हे कृष्णविवर सापडले. या शोधनिबंधाचे नेतृत्व करणाऱ्या ख्रिस्तोफर ओंकेन यांनी गत 50 वर्षांपासून हे संशोधन सुरू होते असे स्पष्ट केले. आतापर्यंत वैज्ञानिकांनी अनेक प्रकारचे ब्लॅकहोल्स शोधले. मात्र हे कृष्णविवर त्यांच्या नजरेस पडले नाही.
Sagittarius A पेक्षा 500 पट मोठे
काही महिन्यांपूर्वी संशोधकांनी Sagittarius A नावाचे कृष्णविवर शोधले होते. ते आकाशगंगेच्या केंद्रस्थानी आहे. नवे कृष्णविवर त्यापेक्षा 500 पट मोठे आहे. संशोधक सॅम्युअल लाई म्हणाले, हे कृष्णविवर एवढे मोठे आहे की, आपल्या सौर मंडळातील ग्रहांच्या सर्व कक्षा त्यात समाविष्ट होऊ शकतात.
ताऱ्यांपेक्षा 7 हजार पट अधिक तेजस्वी
नवे कृष्णविवर आतापर्यंत आढळलेल्या सर्वच कृष्णविवरांपेक्षा 7 हजार पट जास्त तेजस्वी आहे. ओकेंन यांच्या माहितीनुसार, दोन आकाशगंगांची एकमेकांशी टक्कर झाली असेल. यामुळे कृष्णविवराला गिळंकृत करण्यासाठी अंतराळातील अनेक वस्तू भेटल्या असतील. त्यामुळे ते अधिक तेजस्वी झाले असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.