आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेकदा मुले जास्त हट्ट करतात किंवा रडताना गप्प करण्यासाठी आई-वडील त्यांच्या हातात मोबाइल देतात. यामुळे मुलं तत्काळ शांत होते खरे, मात्र याचे गंभीर परिणाम समारे आले आहेत.मुलांच्या पालन पोषणातील ही मोठी चूक आहे. मिशिगन मेडिसिनमध्ये प्रकाशित एका अहवालानुसार, मुलांना शांत करण्यासाठी मोबाइल देणे, त्यांना मानसिक रुग्ण करू शकतो. यामुळे त्यांच्यात चिडचिड होते आणि अनेकदा आव्हानात्मक स्थितीत आक्रमक वर्तन करतात. यामुळे मुलांच्या शारीरिक हालचाली कमी होतात. दुसरीकडे, त्यांचे वर्तनही वाढत्या वयासोबत बदल घडतो. अशी मुले भावनात्मकदृष्ट्या खूप दुबळे होतात. याचा परिणाम बहुतांश मुलांवर दिसून येत आहे. जामा पीडियाट्रिक्स मिशिगन मेडिसिनच्या अभ्यासानुसार, ३-५ वर्षे वयातील मुलांना शांत करण्यासाठी स्मार्टफोन आणि टॅब्लेटसारखी उपकरणांचा वारंवार वापर मुलांमध्ये भावनात्मक विकृती निर्माण करू शकते.
स्क्रीन टाइम वाढल्यामुळे त्यांच्यात नकारात्मकता वाढते. यासोबत आव्हानात्मक स्थितीत त्यांचा प्रतिसाद वाईट होतो. एवढेच नव्हे तर त्यांच्या शरीरात एक प्रकारची शिथिलता येते. मुलांचा मूड स्विंग होण्यास सुरुवात होते. अनेकदा खूप उत्तेजित होतात आणि अनेकदा चेहऱ्यावर उदासीनता दिसते. अशी लक्षणे दिसल्यास मुलांना मोबाइल देणे बंद करा.
ट्रॅम्पोलिनवर उड्या मारण्यासारख्या गोष्टींद्वारे लक्ष हटवा प्रमुख संशोधक रेडेस्की यांनी सांगितले की, मुलांना शांत करण्यासाठी अनेक पर्याय वापरता येतील.यातून त्यांच्या विकासात मदत मिळू शकते. उदा. झोका खेळणे, ट्रॅम्पोलिनवर खेळणे,चिखल खेळणे,याद्वारे लक्ष वळवू शकता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.