आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुमच्या मुलाचे वय सहा वर्षांहून कमी आहे. पण त्याला शांत ठेवणे, जेवण भरवताना किंवा मन रिझवण्यासाठी माेबाइलवरील व्हिडिओ दाखवत असल्यास ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ब्रेन इंज्युरी एक्स्पर्ट व न्यूराेसायकाॅलाॅजिस्ट डाॅ. अल्वाराे बिलबाओ यांनी याबाबतचा महत्त्वाचा दावा केला आहे. सहा वर्षांहून कमी वयात स्क्रीनशी संपर्क आल्यास बालकांमध्ये चिडचिडेपणा येताे. माेबाइलचा वापर न करणाऱ्या मुलांच्या तुलनेत त्यांची एकाग्रताही कमी हाेते. स्मरणशक्तीही कमकुवत हाेते. एवढेच नव्हे तर त्यांचे मन आणि मेंदूतील बालपणीच्या आठवणीदेखील धूसरच नाेंदवल्या जातात. आपल्याला नेमकी कशाची आवड आहे हे ठरवतानादेखील मुलांना अडचणी येतात.
हा घटक त्यांना जीवनात पुढे प्रगती करण्यासाठी महत्त्वाचा ठरताे, असे डाॅ. बिलबाओ यांनी केलेल्या संशाेधनातून स्पष्ट हाेते. स्क्रीनवर जास्त वेळ दिल्यानंतर मुलांमध्ये अटेंशन डेफिसिट डिसआॅर्डर, डिप्रेशन, अॅडिक्शनसारख्या समस्या निर्माण हाेतात. त्याचा दीर्घकालीन परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर हाेताे. म्हणूनच भावनिक व बाैद्धिक रूपाने विकसित झाल्यानंतरच मुलांच्या हाती स्क्रीन डिव्हाइस दिला पाहिजे. अनेक आई-वडील मुलांचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी मुलांना स्क्रीन पाहण्यासाठी प्राेत्साहन देतात. हे म्हणजे मुलांना ८०० सीसीची माेटार बाइक देण्यासारखे धाेकादायक आहे. वास्तविक अशा मुलांना आधी गाडी कशी चालवायची हे तर शिकू द्या. मुलांची शारीरिक सुरक्षा, सुरक्षित वातावरण आणि आई-वडील हातून पाेषण हाेणे गरजेचे असते. २-५ वर्षांच्या मुलांमध्ये शिक्षणाव्यतिरिक्त स्क्रीन आठवड्यात १ तास व शिक्षणाविषयी व्हिडिओचा कालावधी आठवड्यात ३ तासांहून कमी असला पाहिजे. १८-२४ महिन्यांच्या बालकांचे आई-वडील त्यांना अधूनमधून शैक्षणिक कार्यक्रम दाखवू शकतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.