आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • It Is Now Possible To Breed Even In Old Age; Preparing To Freeze Embryos With Sperm, Eggs From 10 To 55 Years

ब्रिटन:आता वृद्धापकाळातही वंशवृद्धी करता येणार; स्पर्म, एगसह भ्रूण गोठवण्याची कालमर्यादा 10 वरून 55 वर्षे करण्याची तयारी

लंडन10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये आता नातवंडांना खेळवण्याच्या वयातही वंशवृद्धी करता येणार आहे. म्हणजे ब्रिटिशांना आता वयाच्या पंच्याहत्तरीतही अपत्यप्राप्तीचे सुख अनुभवता येईल. तेथील बोरिस जॉन्सन सरकार स्पर्म (शुक्राणू), एग (बीजांड) व भ्रूण (एम्ब्रियो) गोठवण्याची कालमर्यादा १० वरून ५५ वर्षे करण्याची तयारी करत आहे. ब्रिटनचे आरोग्यमंत्री साजिद जाविद यांच्यानुसार हा प्रस्ताव लवकरच संसदेत मंजुरीसाठी पाठवला जाईल.

जाविद म्हणाले, स्टोअरेजच्या कालमर्यादेमुळे लोकांना वंशवृद्धीसारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतात. नव्या कायद्यामुळे लोकांना दिलासा मिळेल. हा निर्णय लोकांना प्रजनन व समानतेच्या स्वातंत्र्याकडे नेणारे ‘मोठे पाऊल’ आहे. कारण सर्वांसाठी समान नियम लागू होतील. या निर्णयामुळे लोकांना कुटंुब नियोजनच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. उदा- वयाच्या ७५ व्या वर्षी एखाद्या पुरुषाला पिता बनायचे असेल तर तो वयाच्या विशीतच गोठवलेल्या शुक्राणूंचा वापर करू शकेल. ब्रिटनमध्ये सामाजिक कारणांमुळे दोन तृतीयांश महिला वयाच्या पस्तिशीत बीजांडे गोठवतात. या वयात महिलांची प्रजनन क्षमता वेगाने घटू लागते. मात्र आता त्यांना विशीतच बीजांडे गोठवण्याची सुविधा मिळेल. तसेच पुढील १० वर्षांत गर्भधारणेची बाध्यताही नसेल. ह्यूमन फर्टिलायझेशन अँड एम्ब्रियोलॉजी अॅथॉरिटीच्या अध्यक्ष ज्युलिया चेन म्हणाल्या, महिलांनी जेवढ्या लवकर बीजांडे फ्रीझ केली तर नंतर यशस्वी आयव्हीएफ गर्भधारणेची शक्यता तेवढीच वाढते.

ब्रिटिश फर्टिलिटी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. राज माथुर म्हणाले ‘यामुळे गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या लोकांसह सामान्य दांपत्यांनाही मोठा दिलासा मिळेल. ज्या कारणाशी लोकांचे भविष्य निगडित असते, त्या मुलभूत अधिकारांची सुरक्षा आपल्याला सुनिश्चित करावी लागेल.

आठ वर्षांत १० पट वाढली बीजांडे फ्रीझ करणाऱ्या महिलांची संख्या
भविष्यात अपत्यप्राप्ती करायची असेल तर अडचण येऊ नये म्हणून फ्रीझिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एग, स्पर्म आणि एम्ब्रियो साठवून प्रजनन क्षमतेला संरक्षित केले जाते. ब्रिटनच्या आरोग्य व समाजकल्याण विभागाने (डीएचएससी) म्हटले की, रॉयल कॉलेज ऑफ ओब्स्टेट्रिशियनच्या संशोधन अहवालानंतर दिलेल्या सल्ल्याच्या आधारे हा बदल केला जात आहे. त्यात म्हटले होते की, बीजांडे आणि भ्रूण प्रदीर्घ काळापर्यंत गोठवून ठेवल्यानंतरही त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत नाही. ब्रिटनमध्ये २०१० पासून २०१८ पर्यंत बीजांडे गाेठवणाऱ्या महिलांची संख्या सुमारे १० पटींनी वाढली आहे. देशात बीजांडे गाेठवण्याचा खर्च ३.३९ लाख रुपये आहे. तसेच उपचारांसाठी सुमारे १.५२ लाख रुपये खर्च येतो. तसेच स्टोरेजसाठी दरवर्षी ३५ हजार रुपयांचे शुल्क भरावे लागते.

बातम्या आणखी आहेत...