आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • It Is Possible To Defeat Kovid 19 Without Vaccine!, Claim By Klug The Director Of The World Health Organization

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:लसविना कोविड-19 चा पराभव करणे शक्य! जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक क्लुग यांचा दावा, अमेरिकेने उडवली खिल्ली

वाॅशिंग्टन3 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • भ्रष्ट डब्ल्यूएचओच्या नेतृत्वाखाली काम करणार नाही : अमेरिका

जागतिक महामारीच्या काळात जगभरातील संशाेधन काेविड-१९ संबंधी लस विकसित करण्याचा प्रयत्न करत असतानाच काेराेनावर विजय मिळवू, विना लसीचाही विजय मिळवता येऊ शकताे, असा दावा युराेपचे संचालक हॅन्स क्लुग यांनी केला आहे.

युराेपमध्ये राष्ट्रीय पातळीवर लाॅकडाऊन लागू करण्याची गरज नाही. युराेप विना लस काेविड-१९ साेबत राहू शकताे. साेबतच महामारीलादेखील पराभूत करू शकताे. परंतु स्थानिक पातळीवर लाॅकडाऊन लागू करावा लागेल. महामारीसाेबत राहण्याचे आपण शिकल्यानंतर आपण हे निश्चितपणे साध्य करू शकताे. अगदी उद्यापासून त्याची अंमलबजावणी करता येईल, असा दावा क्लुग यांनी केला. त्यावर अमेरिकेने कडक प्रतिक्रिया दिली आहे. काेराेना लसीवरील आंतरराष्ट्रीय प्रकल्पात अमेरिका सहभागी हाेणार नाही. कारण, त्यात जागतिक आराेग्य संघटनादेखील सहभागी आहे. व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जेड डिरे म्हणाले, डब्ल्यूएचआेच्या नेतृत्वाखाली १७२ देशांच्या उपक्रमात अमेरिका मुळीच सहभागी हाेणार नाही. महामारीला पराभूत करण्यासाठी अमेरिका आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांसमवेत मिळून काम करेल. परंतु भ्रष्ट जागतिक संघटना व चीनचा प्रभाव असलेल्या मल्टिलेटरल संस्थांच्या दबावाखाली येणार नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी संघटनेला चीनच्या तालावर चालणारी संघटना असे संबाेधले हाेते. दरम्यान, अमेरिकेत आतापर्यंत ६.०९ लाखांहून जास्त काेराेनाचे रुग्ण आढळून आले आहेत. १.८५ लाख लाेकांचा त्यात मृत्यू झाला आहे. दुसरीकडे सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लुंगने महामारीवर ताेडगा काढण्यासाठी चुकांबद्दल माफी मागितली आहे. स्थलांतरितांबद्दलही अशी चूक झाली हाेती. तेव्हा महामारीदरम्यान २०-२० मजुरांना एकाच खाेलीत ठेवण्यात आले हाेते. सरकारने आक्रमक पद्धतीने कारवाई करायला हवी हाेती, असे त्यांनी संसदेत म्हटले. ५८ लाख लाेकसंख्या असलेल्या सिंगापूरमध्ये ५६ हजार ९०१ े रुग्ण आहेत. २७ जणांचा मृत्यू झाला.

काेराेना काळात जनतेला दक्षिण काेरिया वाटणार दुसऱ्यांदा कॅश

दक्षिण काेरिया काेराेना काळात दुसऱ्यांदा लाेकांमध्ये कॅशचे वाटप करणार आहे. दक्षिण काेरियाचे अर्थमंत्री हाँग नॅम-की यांनी ही माहिती दिली. सरकार व सत्ताधारी पक्षातील काही कुटुंबांना कॅशचे वाटप करावे लागेल. कारण काेराेनामुळे नवे नियम लागू करण्यात आले हाेते. त्याचा अर्थव्यवस्थेला फटका बसला. सर्व कुटुंबांना पैसे देण्याएेवजी गरजवंतांना पैसे देणे जास्त महत्त्वाचे ठरेल. याआधी दक्षिण काेरियात मेमध्ये सर्व कुटुंबांना राेखीने पैसे दिले हाेते. महामारीच्या काळातही लाेकांना संकटाचा मुकाबला करता यावा असा त्यामागील उद्देश हाेता. आतापर्यंत येथे २० हजार ४४९ काेराेना रुग्ण समाेर आले आहेत. ३२६ लाेकांचा मृत्यू झाला आहे. १५ हजार २३६ लाेक त्यात बरे झाले आहेत.