आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • It Was Difficult To Find People For Work In Britain; There Is A Shortage Of Workers Even After Recruiting Inmates

लंडन:ब्रिटनमध्ये कामासाठी लोक मिळणे झाले अवघड; कारागृहातील कैद्यांची कामावर भरती करूनही भासत आहे कामगारांची टंचाई

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील अनेक देशांमध्ये रोजगार उपलब्ध नाहीत. लोकांना काम उपलब्ध नाही. मात्र, ब्रिटनमध्ये कोरोना व ब्रेक्झिटमुळे काम करणारे मिळणे कठीण झाले आहे. स्थिती अशी आहे की, कारागृहात बंद कैद्यांची सुटका करून कर्मचारी म्हणून त्यांची भरती केली जात आहे. ब्रेक्झिटमुळे चालक, फळ वेचणारे आणि कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याने ब्रिटनमध्ये मागील काही आठवड्यांपासून सुपरमार्केट खाली आहेत. आता हे संकट दूर करण्यासाठी व्यावसायिक संस्था एका योजनेंतर्गत कैद्यांची भरती करत आहेत. योजनेंतर्गत कामासाठी कैद्याला एक दिवसासाठी सोडले जाते.

वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांच्या मोठ्या टंचाईमुळे येथील एक कारागृह तर पूर्णपणे कैद्यांनी रिकामे झाले आहे. ब्रिटनमध्ये ऑक्टोबर २०२० आणि मार्च २०२१ दरम्यान कैद्यांना एकूण ५८७५२ दिवसांसाठी कामासाठी सोडण्यात आले होते. आता ही संख्या सतत वाढण्याचा अंदाज आहे. कैद्यांना कामाच्या वेळेआधी कारागृहातून सोडले जाते आणि काम पूर्ण केल्यानंतर त्यांना कारागृहात परत यावे लागते. या कामासाठी त्यांना मोबदलाही दिला जातो. मात्र, कैदी पळून जाऊ नये याची जबाबदारी संस्थेची असते.

ब्रिटनच्या रिटोल कन्सोर्टियमचे म्हणणे आहे की, सुमारे ९० हजार एचजीव्ही चालकांची टंचाई आहे. यामुळे पुरवठा साखळीवर मोठा दबाव आला आहे. यामुळे कैद्यांना काम करण्यासाठी सोडण्याच्या दिवसात आणखी वाढ होऊ शकते. तसेच सप्टेंबरमध्ये शाळा पुन्हा सुरू होणे आणि कर्मचारी पुन्हा कार्यालयात आल्यानंतर स्थिती आणखी गंभीर होऊ शकते.

विनंती : अन्न पुरवठादारांना कैद्यांच्या सुटकेसाठी परवाना दिला जावा
अन्न पुरवठादारांना तात्पुरत्या परवाना कार्यक्रमांतर्गत यात प्राधान्य देण्याची विनंती असोसिएशन ऑफ मीट सप्लायर्स देशाच्या कारागृह सेवेला करण्याच्या तयारीत आहे. याबाबत याच आठवड्यात बैठक होणार आहे. मात्र, असेही सांगण्यात येत आहे की, कर्मचाऱ्यांची मागणी एवढी जास्त आहे की, फक्त ती पूर्ण करू शकत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...