आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेतील लास वेगास येथे गुरुवारपासून सीईएस-२०२३ ला प्रारंभ झाला. दोन वर्षांनंतर निर्बंधांशिवाय हे आयोजन होत आहे. कोरोनामुळे २०२१ मध्ये ते व्हर्च्युअली आयोजित करण्यात आले होते. गतवर्षी अतिशय छोट्या स्तरावर याचे आयोजन झाले होते. यामध्ये जगातील १७४ देशांतील ३२०० वर कंपन्या आधुनिक विद्युत उपकरणांचे प्रदर्शन करत आहेत. पैकी ३५% कंपन्या अमेरिकेतील आहेत. ऑटोमोबाइल उद्योगांसाठीही हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. यंदा ईव्हींबद्दलचा जो उत्साह दिसत आहे तो यापूर्वी कधीही दिसला नव्हता.
मानवाच्या मदतीशिवाय डिलिव्हरी करतोय रोबोट ऑटोनॉमी कंपनीचा हा रोबोट कोणत्याही मानवी मदतीशिवाय अन्न आणि इतर वस्तू पोहोचवू शकतो. तसेच तो विमानतळावर जेवणही पोहोचवू शकतो. कंपनी सध्या रोबोटकडून ६.४ किलोमीटरपर्यंत डिलिव्हरी देण्याबद्दल बोलत आहे.
सेनिडर इलेक्ट्रिक स्मार्ट होम-प्रकाशाची काळजी स्मार्ट होम अप्लायन्स. घरातील सर्व इलेक्ट्रिकल सर्किट जोडली जातील. जेव्हा सूर्यप्रकाश असेल तेव्हा दिवे बंद होतील. इलेक्ट्रिक कार-स्कूटरही चार्ज होतील. अॅपवरून बॅटरी बॅकअप. जिथे जेवढी गरज तितकीच वीज खर्च केली जाईल.
कार बीएमडब्ल्यू आय व्हिजन डी बोलेल बोलणारी बीएमडब्ल्यू ईव्हीला भविष्यातील कार म्हटले जात आहे. यात संवर्धित वास्तव आणि व्हॉइस रेग्युलेटेड व्हर्च्युअल असिस्टंट आहेत. मेटाव्हर्सद्वारे आनंदासारख्या भावना देखील दर्शवेल. यात ऑटोमेशन फीचर असेल.
ओएलईडी टीव्हीमध्ये वायरची गरज नाही एलजी इलेक्ट्रॉनिक्सने ९७ इंचांचा वायरलेस टीव्ही शोकेस केला आहे. हा झीरो कनेक्ट बॉक्सशी जोडलेला असेल, जो टीव्हीच्या ९ मीटरच्या आत कुठेही ठेवता येईल. कंपनीने किंमत सांगितलेली नाही. या वर्षी एप्रिलपासून बाजारात उपलब्ध होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.