आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चंद्रावर राहण्यासाठी मासिक पावणे तीन कोटी खर्च, पहिले घर बांधण्यासाठी लागतील 360 कोटी रुपये

न्यूयॉर्कएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चंद्रावर वास्तव्यासाठी किती खर्च... अमेरिकी कंपनीने दिला हिशेब
  • चंद्रावरील उत्तर भागात ‘सी ऑफ रेन्स’ ठरेल सर्वात सुंदर-चांगली वस्ती

पृथ्वीवरील गोंधळपासून दूर अगदी शांत जगावे वाटते का?... यासाठी महिन्याकाठी तुम्हाला पावणेतीन कोटी रुपये खर्च करावे लागतील. “मनी’ नामक क्रेडिट ब्रोकर कंपनीने ही रक्कम सांगितली आहे. ग्राहकांना पसंतीची उत्पादने खरेदी करण्यासाठी ही कंपनी कर्ज देते. याच कंपनीने नुकतेच एक गाइड जाहीर केले आहे. यात चंद्रावर राहण्यासाठीचा खर्च देण्यात आला आहे. नासाचे एक पथक २०२४ मध्ये आर्टेमिस मोहिमेअंतर्गत चंद्रावर स्थायी बांधकामासाठी जागा शोधण्यासाठी जाईल. गाइडनुसार, चंद्रावरील बांधकामासाठी साहित्य पृथ्वीवरूनच पाठवले जाईल. येथे घरे वायुरहित करावे लागेल. अवजड उद्योगातील कारखाने जसे भक्कम असतात, तशी ही घरे असतील. अंतराळातील उल्कापिंडांचा मारा सहन करू शकतील अशा खिडक्या आणि तावदाने असतील. शिवाय चोवीस तास पाणी-वीज हवीच. हा सगळा खर्च असेल ३६० कोटी रुपये. दुसऱ्या घराचा खर्च थोडा कमी होईल. कारण, सामग्री आणि मजूर चंद्रावर असतीलच. तेथे विशेष प्रक्रियेने अन्न उगवेल. आण्विक भट्टी वीज पुरवेल. यासाठी ग्रीन हाऊस उभे राहतील. बाकी पाण्याची सोय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होईलच. चंद्रावरील उत्तर भागात सी ऑफ रेन्स हा आकर्षक भाग आहे. हा भाग सर्वात चांगली मानवी वस्ती ठरू शकतो. याला मेयर इम्ब्रियम म्हटले जाते. सुमारे ३०० कोटी वर्षांपूर्वी कुण्या ग्रहाशी धडक होऊन हा भाग तयार झाला होता. त्याचा व्यास गोलाकार असून भोवती सुंदर डोंगररांगा आहेत. जणू एक हिल स्टेशनच!

बातम्या आणखी आहेत...