आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पाऊस:इटली : पर्यटकांच्या आधी पहिल्या पुराचे आगमन !  तीन महिन्यांनंतर एक आठवड्यापूर्वी अनलाॅक झाले हाेते व्हेनिस

व्हेनिस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दरवर्षी व्हेनिसला ३ काेटी पर्यटक भेट देतात.
Advertisement
Advertisement

छायाचित्र इटलीतील सुंदर शहर व्हेनिसच्या सेंट मार्क्स स्क्वेअरचे आहे. पाऊस व उंच लाटांमुळे या भागात पाणीच पाणी आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. आठवड्यापूर्वीच शहर पर्यटकांसाठी अनलाॅक करण्यात आले हाेते. त्यामुळे पर्यटकांच्या आगमनास आता सुरुवात झाली हाेती. परंतु, आता पाण्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या. काेराेनाच्या संसर्गामुळे पहिले तीन महिन्यांपर्यंत पर्यटन स्थळ व हाॅटेल बंद हाेते. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले. त्यातून शहर सावरण्याची तयारी करत हाेते. ताेच नवीन समस्या समाेर आली आहे. गेल्या आठवड्यात पावसाच्या पाण्याने तीन फूट पूर आला हाेता. नहरींची नगरी असलेल्या व्हेनिसमध्ये पाणीपातळी वाढताच पाणी साचू लागते. त्यातून एक चतुर्थांश शहराला पुराचा वेढा पडताे.

गेल्या वर्षी तीन वेळा आला हाेता पूर २०१९ मध्ये व्हेनिस पुरामुळे त्रस्त हाेते. नाेव्हेंबरमध्ये दाेन वेळा व डिसेंबरमध्ये एक वेळा येथील प्रमुख ठिकाणे जलमय झाली हाेती. तेव्हा प्रशासनाला अतिशय अडचणीतून पर्यटकांना हाॅटेलातून बाहेर काढावे लागले हाेते. युराेपात व्हेनिस पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे शहर आहे. दरवर्षी व्हेनिसला ३ काेटी पर्यटक भेट देतात.

Advertisement
0