आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Italy Lockdown Updates: The Lockdown In Italy Will End; In America Challenge Of New Strain Of Corona Virus; News And Live Updates

परिवर्तन:इटलीतील लॉकडाऊन संपणार; अमेरिकेत नव्या स्ट्रेनचे आव्हान; मृत्यूबाबत 7 व्या क्रमांकावरील इटलीतील परिस्थिती बदलतेय

रोम9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 26 एप्रिलपासून देशातील अनेक ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जाणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे

इटलीत कोरोना संसर्गाची स्थिती सुधारत आहे. २६ एप्रिलपासून देशातील अनेक ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जाणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. परंतु त्यासाठी जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे कडक पालन केले पाहिजे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबतीत इटलीचा सातवा क्रमांक लागतो. इटलीचे पंतप्रधान मारियो ड्राघी म्हणाले, संसर्गाच्या बाबतीत देशातील परिस्थितीत सकारात्मक बदल होत आहे. त्यामुळे सरकारने नियमांत शिथिलता आणण्याचे ठरवले आहे. इटलीत २६ एप्रिलपासून संसर्ग कमी असलेल्या भागापासून लॉकडाऊन कमी केला जाणार आहे. या भागांमध्ये रेस्तराँ, सिनेमा सुरू केेले जातील.

आरोग्यमंत्री रॉबर्टो स्पेरंजा म्हणाले, १५ मेपासून आेपन एअर स्विमिंग पूल व १ जूनपासून जिमही सुरू करण्याचा विचार आहे. अमेरिकेत मात्र ब्रिटनचा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. एकूण बाधितांमध्ये या स्वरूपातील बाधितांची संख्या निम्म्यावर आहे. अमेरिकेने त्याचा मुकाबला करण्यासाठी १.७ अब्ज डॉलरची घोषणा केली आहे. सेंटर फॉर डिसिज कन्ट्रोल अँड प्रिव्हेंशनचे संचालक रोशेल वेलेन्स्की यांच्या म्हणण्यानुसार ७० टक्क्यांहून जास्त वेगाने हा विषाणू पसरतो. म्हणूनच त्याला तोंड देणे हे आव्हानात्मक आहे.

ब्राझील : महिलांना इशारा- गर्भधारणेचा विचार सोडा
ब्राझीलमध्ये आई होण्याची इच्छा बाळगणाऱ्या महिलांना नवा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाची सर्वात वाईट स्थिती निघून जात नाही तोवर गर्भधारणेचा विचार करू नये. आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी राफेल पॅरंट म्हणाले, ब्राझीलमध्ये पी-१ व्हेरिएंट आढळला आहे. परीक्षणात तो गरोदर महिलांसाठी जास्त घातक अाहे.

ब्रिटन : वय व धोका लक्षात घेऊन गरोदर महिलांच्या लसीकरणास मंजुरी
ब्रिटनमध्ये गरोदर महिलांच्या लसीकरणास मंजुरी देण्यात आली आहे. नव्या गाइडलाइन्समध्ये अशा महिलांसाठी मंजुरी आहे. त्याचबरोबर नुकत्याच प्रसूत झालेल्या महिला किंवा स्तनदा मातांनाही लसीकरण करता येणार आहे. जेसीव्हीआयचे प्रो. वेई शेन लिम म्हणाले, डोस घेण्यासाठी महिलेेचे वय आणि धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाईल. लसीकरणातून धोका नाही.

जाणून घेऊ नवा व्हेरिएंट, महामारीवर त्याचा परिणाम
कोरोनाच्या नव्या रूपाची ओळख पटली नाही, असा संशोधकांचा एकही आठवडा गेला नसावा. आतापर्यंत ब्रिटन, ब्राझील, दक्षिण आफ्रिकेत व्हेरिएंटची चर्चा आहे. जाणून घेऊया या स्वरूपाबद्दल...

म्युटेशन काय आहे?
विषाणूचे म्युटेट (परिवर्तन) होणे एक स्वाभाविक प्रक्रिया असते. सर्वत्र सहजपणे फैलाव व्हावा यासाठी विषाणू स्वत:मध्ये असा बदल करून घेतो. त्यातून तो लोकांना बाधित करू शकतो. कोरोनाचा विषाणूही तेच करत आहे. कोरोना विषाणू महिन्यातून दोन वेळा बदल करत आहे. इन्फ्लूएंझाचा विषाणू सरासरी दुपटीने बदल करतो. कोरोना विषाणूत सुरुवातीचे परिवर्तन D614G असे होते.

जगभरातील किती म्युटेशन आहेत?
N501Y यास नेली म्हणून आेळखले जाते. वेगाने पसरणारा B117 या 501YV1 व्हेरिएंट पहिल्यांदा केंटमध्ये आढळला. B1351 किंवा 501YV2 पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत आढळला. P1 किंवा 501YV3 व्हेरिएंट पहिल्यांदा ब्राझीलमध्ये आढळला. आतापर्यंतच्या सर्वात चिंताजनक म्युटेशनपैकी E484K किंवा एक आहे. तो स्पाइक प्रोटीनमध्येही बदल करतो.

बातम्या आणखी आहेत...