आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इटली:उपासमारीपेक्षा कोरोना विषाणूसाेबत जगण्याची इटलीत लाेकांची तयारी; सर्वाधिक विषाणू संसर्ग झालेल्या लाेम्बार्डीमधून

इटलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दरराेज 3 हजारांहून कमी रुग्ण येताहेत 21,067 मृत्युमुखी

लाॅकडाऊनच्या सहाव्या आठवड्यात पाेहाेचले आहे. लाेक अनिश्चितता, नैराश्य, अविश्वास, भीती व चिंतेच्या छायेखाली जगत आहेत. कंपन्यांनी लाेकांना सुटीवर पाठवले आहे. त्यामुळे अस्वस्थता, नकारात्मकता, असुरक्षेची जाेखीम या सर्व गाेष्टींचे रुपांतर सामाजिक तणावात झाले आहे. त्यामुळेच लाेकांनी आता काेराेना विषाणूसाेबत जगणे व कामावर परतण्यासाठी मनाची तयारी केली आहे. 

सरकारने आर्थिक नुकसान भरपाई म्हणून लघु-मध्य व माेठ्या उद्याेगांना ४०० अब्ज युराेचे पॅकेज दिले आहे, परंतु ते पुरेसे नाही. सुतारकाम करणारे अँटाेनियाे बाेरगिया म्हणाले, आम्हाला ६०० युराे मदत मिळाली, परंतु माझ्या दुकानाचे भाडे ८०० युराे आहे आणि वीज देयक सरासरी २५० युराे द्यावे लागते. परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. कारण अनिश्चिततेने पाेट भरत नाही. देशातील सर्वात माेठी उद्याेग संघटना काॅन्फइंडस्ट्रियाने देखील सरकारला लाॅकडाऊन हटवण्यात यावा, असा दबाव सुरु केला आहे. या संघटनेशी १.५ लाख कंपन्या जाेडलेल्या आहेत आणि त्यांचे किमान ५५ लाख सदस्य आहेत. देश कसा कार्यरत हाेईल? हे स्पष्ट सांगावे, अन्यथा काेराेनापेक्षाही धाेकादायक अशी आर्थिक संकट निर्माण हाेईल, असा इशारा या संघटनेने सरकारला दिला आहे. सरकार देखील अतिशय वेगाने एक आराखडा तयार करत आहे. काेराेनाचा कमी परिणाम झालेल्या दक्षिणेकडील भागात बुकस्टाेअर, स्टेशनरी व मुलांच्या कपड्यांची दुकाने उघडली आहेत. मात्र कच्चा माल पुरवठा करणे, कारखान्यांची साफसफाई, सॅनिटाइझ करण्याची परवानगी काही कंपन्यांना देण्यात आली आहे. सर्वात आधी आॅटाे क्षेत्र, फॅशन, डिझाइन व लाेह व्यवसाय सुरू हाेणार आहे, परंतु लाेम्बार्डी व परिसरातील परिस्थिती अजूनही पूर्वीसारखीच ठप्प आहे. काेराेनाचा जगातील सर्वाधिक परिणाम झालेला हा प्रांत आहे. इटलीत काेराेनामुळे सुमारे २१ हजार मृत्युमुखी पडले. त्यापैकी लाेम्बार्डीचे ११ हजारांवर लाेक आहेत. राजधानी मिलान याच क्षेत्रात समाविष्ट हाेतात. त्याच्या शेजारील इमिलिया, राेमाग्ना, पीडमाँट, व्हेनेटाेमध्येही काेराेनामुळे माेठी हानी झाली. या संपूर्ण प्रांताची देशाच्या जीडीपीतील भागीदारी ४५ टक्के आहे. दुसरीकडे देशात आता नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ही चांगली बातमी ठरली आहे. त्याचे प्रमाण १.७ टक्क्यांवर आले आहे. सरासरी दरराेज ३ हजार रुग्ण येतात. सर्वकाही नियाेजित कार्यक्रमानुसार पार पडले तर ३ मे पर्यंत लाॅकडाऊन रद्द केला जाईल. त्याची जबाबदारी ५९ वर्षीय व्हिटाेरिया क्लाे यांच्यावर साेपवली आहे. 

दुकानांत गर्दी नाही, नियाेजित वेळेत खरेदी

स्टेशनरी, बुक स्टाेअर, मुलांचे कपड्यांची दुकाने, काॅम्प्युटर इत्यादी अनेक क्षेत्रांवरील निर्बंध हटवण्यात येणार आहेत. दुकानांत गर्दी हाेऊ नये म्हणून लाेकांसाठी टाइम स्लाॅट्समध्ये खरेदी करावी लागेल. इटलीच्या बहुतांश क्षेत्रांत मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. रेड झाेन भागात एक काेटी मास्कचे वाटप करण्यात आले आहे. 

  • ३ मे पासून हटणे शक्य, शाेरूममध्ये एकावेळी एकच ग्राहक

मास्क आता येथे जीवनाचा घटक

बुक स्टाेअर, स्टेशनरी सुरू झाले आहेत. लाेकांना मास्क व साेशल डिस्टन्सिंगचे काटेकाेरपणे पालन करावे लागते. साेबतच ग्राहकांना हातमाेजेही उपलब्ध करून दिले जात आहेत. 

दिवसातून २ वेळा सॅनिटाइझ अनिवार्य 

की-बाेर्ड, टच स्क्रीन व व्यवहार केल्या जाणाऱ्या वस्तूंना वेळाेवेळी सॅनिटाइझ करणे अनिवार्य. मास्क  अनिवार्य असेल. दुकानांमध्ये हातमाेजे अनिवार्य असतील.

शाेरूममध्ये येण्या-जाण्याचे गेट वेगवेगळे

४० चाैरस मीटरच्या दुकानात दाेन आॅपरेटरशिवाय एकावेळी एकच व्यक्ती राहील. प्रवेश किंवा बाहेर जाण्याची स्वतंत्र व्यवस्था. लाेकांना व्यवहारासाठी टाइम स्लाॅट निश्चित केला जाईल. 

व्हेंटिलेशनची पुरेशी व्यवस्था हवी

कारखान्यांची देखभाल, खर्च व्यवस्थापनासह सॅनिटायझेशनची परवानगी दिली आहे. दिवसातून दाेनवेळा स्वच्छता करावी लागेल. कारखान्यांत नैसर्गिक हवा-प्रकाश व्यवस्था अनिवार्य.

बातम्या आणखी आहेत...