आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोपला जाणारे 1300 स्थलांतरित समुद्रात अडकले:बचावासाठी इटलीने सुरू केली मोहीम, काल 14 जणांचा मृत्यू

रोम19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो कॅलेब्रिया भागातील समुद्राच्या मध्यभागी अडकलेल्या स्थलांतरितांच्या बोटीचा आहे. - Divya Marathi
हा फोटो कॅलेब्रिया भागातील समुद्राच्या मध्यभागी अडकलेल्या स्थलांतरितांच्या बोटीचा आहे.

कॅलेब्रिया प्रदेशात समुद्रात अडकलेल्या किमान 1,300 लोकांना वाचवण्यासाठी इटलीच्या तटरक्षक दलाने बचाव मोहीम सुरू केली आहे. हे निर्वासित वेगवेगळ्या ठिकाणांहून युरोपात येण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, ते कोणत्या देशाचे आहेत हे अद्याप कळू शकलेले नाही.

याबाबत माहिती देताना इटालियन तटरक्षक दलाने सांगितले की, हे ऑपरेशन खूप कठीण असणार आहे. कारण ज्यांना वाचवायचे आहे अशांची संख्या खूप जास्त आहे. ते बोटीतून ठिकठिकाणी भटकत आहेत. पहिल्या 500 लोकांना वाचवण्यासाठी तटरक्षक दलाने आपली जहाजे पाठवली आहेत.

इटलीला जाण्यासाठी स्थलांतरितांची बोट समुद्राच्या मध्यभागी अडकलेली दिसून येते.
इटलीला जाण्यासाठी स्थलांतरितांची बोट समुद्राच्या मध्यभागी अडकलेली दिसून येते.
इटलीला पोहोचण्यासाठी समुद्राच्या मध्यभागी अडकलेल्या लोकांची सुटका करत असलेले इटालियन तटरक्षक दल
इटलीला पोहोचण्यासाठी समुद्राच्या मध्यभागी अडकलेल्या लोकांची सुटका करत असलेले इटालियन तटरक्षक दल

इटालियन नौदलाकडूनही मदत मागवण्यात आली होती. हे 500 लोक इटालियन द्वीपकल्पापासून 1125 किलोमीटर अंतरावर एका बोटीवर आहेत. त्याच वेळी 800 लोकांना दुसर्‍या जहाजातून वाचवले जाईल, जे दोन वेगवेगळ्या बोटींमध्ये आहेत. 1300 लोकांना वाचवण्यासाठी तटरक्षक दलाने नौदलाचीही मदत घेतली होती. त्यानंतर लष्करी जहाजही पूर्ण वेगाने या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. याचा एक व्हिडिओही जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये समुद्रात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या बोटी दाखवण्यात आल्या आहेत.

खरं तर, गत महिन्यात इटलीला पोहोचत असताना स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक बोट खडकावर आदळली आणि बुडाली. ज्यामध्ये 73 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी बहुतांश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील होते. या अपघातामुळे इटलीच्या राइट विंग सरकारवर जोरदार टीका झाली होती. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारवर स्थलांतरितांना वाचवण्यासाठी योग्य वेळी कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला होता.

हे Staccato di Cutro बीचचे छायाचित्र आहे. इटालियन मीडियानुसार, येथील समुद्रातून 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
हे Staccato di Cutro बीचचे छायाचित्र आहे. इटालियन मीडियानुसार, येथील समुद्रातून 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

ट्युनिशियाहून इटलीला येणाऱ्या 14 जणांचा मृत्यू

अल जझीराच्या वृत्तानुसार, काल म्हणजेच शुक्रवारी ट्युनिशियाहून इटलीला निघालेली बोट बुडाल्याने 14 जणांचा मृत्यू झाला. तर 54 जणांना वाचवण्यात यश आले आहे. ही घटना भूमध्य समुद्रात घडली.

वारंवार अपघात होऊनही स्थलांतरितांची इटलीवारी

स्थलांतरित लोक इटलीला पोहोचण्यासाठी अपारंपरिक पद्धती वापरत आहेत, ज्यात त्यांना सतत आपला जीव गमवावा लागत आहे. अहवालानुसार, बुधवारीही 3,000 निर्वासित बोटीतून इटलीला पोहोचले आहेत. तटरक्षक दलाने इटलीच्या दक्षिण बेटावरून 500 जणांची सुटका केली. गुरुवारी 1869 निर्वासित 41 बोटीतून या बेटावर पोहोचले होते.

बातम्या आणखी आहेत...