आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजपानच्या प्राथमिक शाळांमध्ये लंच टाइम टॉक म्हणजेच इत्देकिमासू यास पुन्हा परवानगी मिळाली आहे. कारण जपानमध्ये संसर्ग वाढू लागला आहे. कोरोना काळात सातत्याने प्राथमिक शाळांत मुलांना परस्परांसमोर बसून डबा खाऊ नये, अशा सूचना होत्या. तेव्हा शाळांनी मोकूशोकू अर्थात शांत बसून भोजन करण्यास सांगितले होते. जपानचे शिक्षण मंडळ म्हणाले, लंचच्या दरम्यान गप्पा मारण्यावर लावलेली बंदी हटवण्यात आली आहे. आता इत्देकिमासू म्हणजे लंचच्या वेळी मुले परस्परांशी संवाद साधू शकतील. त्यासाठी आवश्यक परवानगी देण्यात आली आहे. शाळेचे प्राचार्य तनाका म्हणाले, मोकुशोकूमुळे मुलांच्या सामाजिक व शैक्षणिक विकासावर नकारात्मक प्रभाव पडत आहे. जपानमध्ये हॉटेल-रेस्तराँ सुरू करण्यात आले असताना शालेय मुलांवर लंच टाइमच्या वेळी अशा प्रकारचे निर्बंध योग्य ठरणार नाहीत. निर्बंध उठवण्याच्या या निर्णयावर मात्र पालंकामध्ये मतभेद आहेत. काहींनी त्यावर समाधान व्यक्त केले. काहींना निर्णय चुकीचा वाटतो.
शाळेत लंचच्या वेळी पुन्हा किलबिलाट
जपानच्या अनेक प्रांतातील प्राथमिक शाळांत लंच टाइमच्यावेळी असलेला किलबिलाट पुन्हा पाहायला मिळू लागला आहे. मुले परस्परांसोबत बसून गप्पाही मारू लागले आहेत. आता आेपन अप सुरू झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.