आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत ६ जानेवारी २०२१ राेजी कॅपिटल हिलवर (अमेरिकन संसद) माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्यावर गुरुवारी सुनावणी झाली. २०२० च्या अध्यक्षीय निवडणूक निकालांना बदलण्याचा हा प्रयत्न मानण्यात आला होता. परंतु सुनावणी करणाऱ्या अमेरिकन काँग्रेस कमिटीसमोर ट्रम्प यांची मुलगी इव्हांका यांनी साक्ष नाेंदवली. निवडणुकीत घोटाळा झाल्याचा वडिलांनी केलेला आराेप इव्हांका यांनी फेटाळून लावला. वडिलांनी केलेल्या दाव्यावर माझा विश्वास नाही. मी अॅटर्नी जनरल बर्र यांचा सन्मान करते. निवडणुकीत घोटाळा झाला होता ही गाेष्ट मी मानत नाही.
समितीचा आराेप : कॅॅपिटल हिलवरील हिंसाचार ही काही दुर्घटना नव्हती. ही ट्रम्प यांची अंतिम भूमिका होती. ट्रम्प यांनी दंगल घडवली. तख्तपालटाचा प्रयत्न केला, असा आराेप संसदीय समितीने आपल्या अहवालातून केला आहे. अशा प्रकारचे भीषण आराेप अमेरिकेत २४६ वर्षांच्या इतिहासात खटल्यादरम्यान काेणत्याही अध्यक्षांच्या विराेधात लावले गेलेले नव्हते. ७ हाऊस डेमोक्रॅट व २ रिपब्लिकन सदस्यांचा समावेश असलेल्या समितीच्या तपासादरम्यान दाेन साक्षीदारांना बाेलावण्यात आले. त्यात कॅराेलिना एडवर्ड््सही आहेत. ते हल्ल्यात जखमी झालेले पाेलिस अधिकारी होते. बेशुद्ध होण्यापूर्वी दंगलखाेर त्यांना देशद्राेही असे संबाेधत होते.त्यांनी आपल्या जबाबात ही बाब नोंदवली आहे.
इव्हांकांसह पती, उपराष्ट्राध्यक्षांच्या साक्षी
इव्हांका ट्रम्प त्यांचे पती जेरेड कुश्नर यांच्यासह अनेक व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले. त्यात तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स, त्यांचे चीफ ऑफ स्टाफ, जनरल मार्क, अटोर्नी जनरल विल्यम बर्र यांच्यासह तत्कालीन ट्रम्प सरकारमधील प्रमुख अधिकाऱ्यांचे व्हिडिआे सादर करण्यात आले. एका व्हिडिआेत ट्रम्प प्रक्षोभक बोलताना दिसतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.