आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
39 वर्षांच्या जेसिंडा अर्डर्न यांना न्यूझीलंडच्या पंतप्रधान हाेऊन केवळ दाेन वर्षे आणि आठ महिने झाले आहेत. परंतु, त्यांनी मिळवलेले यश हे न्यूझीलंडच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या राष्ट्राध्यक्षांच्या तुलनेत कितीतरी माेठे आहे. न्युझीलंडमध्ये अलीकडेच न्यूजहब रिसर्चच्या सर्वेक्षणामध्ये जेसिंडा न्यूझीलंडच्या शतकातील सर्वात लाेकप्रिय पंतप्रधान ठरल्या आहेत. न्यूझीलंडला काेराेनामुक्त करून त्या आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेच्या विषय ठरल्या आहेत. या अगाेदर मार्च २०१९ मध्ये ख्राइस्ट चर्चमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर यातील पीडितांची गळा भेट घेणाऱ्या जेसिंडाच्या छायाचित्रांची खूप चर्चा झाली हाेती. हल्ल्यानंतर जेसिंडा यांची प्रतिक्रिया आणि सकारात्मक भूमिकेमुळे टाइम मासिकाने त्यांना पर्सन आॅफ द इयरसाठी नामांकन दिले. न्यूझीलंडमध्ये झालेल्या निवडणुकीत २००८ आणि २०११ असे दाेनवेळा त्या देशातील सर्वात आकर्षक महिला ठरल्या हाेत्या. जेसिंडा त्यांच्या लेबर पक्षाच्या प्रमुख हाेताच न्यूझीलंडमध्ये ‘जेसिंडामेनिया’ ट्रेंड हाेऊ लागला हीच त्यांच्या लाेकप्रियतेची पावती हाेती. लेबर पक्षाला मिळणाऱ्या निधीमध्ये काही पटीने वाढ झाली. ९ वर्षे सत्तेपासून दूर असलेला लेबर पक्ष जेसिंडाच्या आगमनानंतर दणकून जिंकला. न्यूझीलंडचे नागरिक नेतृत्वगुणांच्या बाबतीत त्यांची तुुलना बराक आेेबामा, तर व्यक्तिमत्त्वाच्या बाबतीत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडाेबराेबर केली जाते.
मध्यमवर्गीय कुटुंब
फळे विकली, बेकरीतही केले काम
न्यूझीलंडमधील हॅमिल्टनमध्ये जेसिंडाचा जन्म झाला. वडील राॅस पाेलिसात हाेते तर आई लाॅरेल शाळेत केटरिंगचे काम करायची. माॅरमाॅन शहरात लहानाच्या माेठ्या झाल्या. वडिलांचे फळांचे दुकान हाेते. शाळेतून आल्यावर त्या फळे विकायच्या तर कधी शेजारी गाेल्फ खेळणाऱ्यांना सफरचंदाची विक्री करायच्या. नंतर काही काळ त्यांनी बेकरीमध्येही काम केले. एका सामान्य मुलांप्रमाणे शेतात बालपण गेले असे जेसिंडाने एका मुलाखतीत सांगितले. त्यांना ट्रॅक्टर चालवण्याची आवड हाेती. पण एका माेठ्या अपघातानंतर घरच्यांनी त्यांचे ट्रॅक्टर चालवणे बंद करण्यात आले.
प्रमुख पदासाठी ७ वेळा नकार
तीन वेळा निवडणुकीत पराभव, मग खासदार
२००८ मध्ये जेसिंडा यांनी पहिल्यांदा निवडणूक लढली परंतु पराभव हाेऊनही त्या संसदेत गेल्या. न्यूझीलंडच्या संसदीय व्यवस्थेंतर्गत नाेंदणीकृत उमेदवार (मिक्स्ड मेंबर प्रपाेर्शनल, एमएमपी) व्यवस्थेंतर्गत हे शक्य आहे. २०११ व २०१४ मध्ये निवडणुकीत पराभूत झाल्या.नंतर पुन्हा नाेंदणीकृत उमेदवार म्हणून संसदेत गेल्या. २०१७ मध्ये आॅकलंडच्या माऊंट अल्बर्ट भागातून त्यांनी निवडणूक जिंकली. लेबर पक्षाच्या उपनेत्या म्हणून राजीनामा दिल्यावर त्या पक्षात क्रमांक २ वर आल्या. आॅगस्ट २०१७ मध्ये पक्ष प्रमुख झाल्या व आॅक्टाेबरमध्ये पंतप्रधान. त्या आधी ७ वेळा लेबर पक्ष प्रमुखपदाचा प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावला.
१७ व्या वर्षीच पक्षात
पंॅट परिधान करण्यासाठी दिला लढा
जेसिंडा वयाच्या ८ व्या वर्षी शहरातील मानवाधिकार संघटनेत सहभागी झाल्या. वयाच्या १७ व्या वर्षी त्या लेबर पक्षात सहभागी झाल्या. महाविद्यालयात असताना जेसिंडा यांनी गणवेशामध्ये मुलींना पंॅट घालण्याची सूट देण्यासाठी प्रशासनाबराेबर लढा दिला. हा पहिला राजकीय विजय हाेता असे त्या म्हणतात. परंतु राजकारणात येण्याची त्यांची इच्छा नव्हती. पदवीनंतर त्यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान हेलेन क्लार्क (१९९९-२००८) यांच्या कार्यालयात काम केले. अडीच वर्षे त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान टाेनी ब्लेअर यांच्या कार्यालयातही जेसिंडा यांनी काम केले हाेते.
७ आठवडे लाॅकडाऊन, २२ दिवसांत केस नाही
५० लाख लाेकसंख्येच्या न्युझीलंडमध्ये गेल्या २२ दिवसांत एकही केस मिळाली नाही. सावधगिरी म्हणून लाेकांची चाचणी सुरू आहे.७आठवड्यांच्या लाॅकडाऊननंतर निर्बंध दूर हाेत आहेत. काेराेनाची १,१५४ प्रकरणे झाली, तर २२ जणांचा मृत्यू झाला.
न्यूझीलंडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान
जेसिंडा न्यूझीलंडच्या ४० व्या तर तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. याआधी जेनी शिपले आणि हेलेन क्लार्क पंतप्रधान हाेत्या. त्या जगातील दुसऱ्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. ३४ वर्षांच्या फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन जगातील सर्वात कमी वयाच्या पंतप्रधान आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.