आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चीनमध्ये गोल्फ खेळताना दिसले जॅक मा; अँटसमूह-अधिकाऱ्यांत तडजोड, जप्ती टळली

बीजिंगएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अलिबाबा समूहाचे सहसंस्थापकाचे 23 दिवसांनी दर्शन

५६ वर्षीय जॅक मा यांनी कंपनीत आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना २०१९ मध्ये कार्यकारी अध्यक्षपद साेडले हाेते. त्यांनी आॅक्टाेबर २०२० मध्ये चीनचे वित्त नियामक व सरकारी बँकांच्या शांघायमध्ये केेलेल्या भाषणात टीका केली हाेती. जॅक मा यांनी सरकारला व्यवस्थेत बदल करावा, नवनवीन गाेष्टींचे प्रयत्न दडपून टाकले जाऊ नयेत, असे आवाहन केले हाेते. या भाषणानंतर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीमध्ये संताप उसळला. त्यानंतर जॅक मा यांच्या उद्याेगाची चाैकशी सुरू झाली. त्यांच्या अँट समूहाच्या सुमारे २.७ लाख काेटी रुपयांच्या आयपीआेला रद्द करून अधिकाऱ्यांनी त्यांना धक्का दिला हाेता.

ई-काॅमर्स कंपनी अलिबाबा व अँट समूहाचे मालक जॅक मा यांच्याबाबतच्या अनेक तर्कवितर्कांना आता विराम लागला आहे. जगातील २५ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती व अलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा २३ दिवसांत दुसऱ्यांदा दिसून आले. नाव सांगण्याच्या अटीवर एका व्यक्तीने ही माहिती दिली. जॅक मा चीनच्या हेनाॅन प्रांतातील ‘द सन व्हॅली गाेल्फ रिसाेर्ट’मध्ये गाेल्फ खेळताना दिसून आले. हेनाॅन बेटाच्या दक्षिणेकडील २७ हाेल काेर्सच्या रिसाेर्टच्या चारही बाजूला हिरवळ आणि नैसर्गिक साैंदर्य दिसते. जॅक मा एखाद्या नवख्या खेळाडूसारखे खेळत हाेते, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. सन व्हॅली गाेल्फ रिसॉर्टबाबत काहीही बाेलण्यास अलिबाबा व अँट समूहाने नकार दिला. त्यातच अलिबाबाचे शेअर बुधवारी १.५ टक्क्यांनी वाढले. त्यांनी १० आठवड्यांतील सर्वात माेठी उसळी मारली. संपत्तीवर जप्ती येणे किंवा तुरुंगात रवानगीची टांगती तलवार त्यांच्यावर हाेती. आता त्यातून जॅक मा बाहेर पडले आहेत. कारण त्यांची कंपनी अँट ग्रुप व चीनचे अधिकारी यांच्यात करार झाला .

बातम्या आणखी आहेत...