आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्द:46 वर्षीय जॅकीने कॅन्सरमुळे पाय गमावला, जिद्दीत ती 104 दिवस रोज 42 किमी धावली

वॉशिंग्टन22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

४६ वर्षीय जॅकी हंट ब्रोएर्समा सकाळी उठते तेव्हा तिच्यासमोर धावण्याचे एकमेव लक्ष्य असते. तेही पूर्ण ४२ िकमी. अर्थात एका मॅरेथॉनएवढे. तिचा हा सलग १०४ दिवस दिनक्रम होता.जॅकीला एक पाय नाही त्यामुळे हा विक्रम झाला आहे. प्रोस्थेटिक पायाने धावणाऱ्या जॅकीच्या म्हणण्यानुसार, रोज क्षमतेत वाढ करणे हेच माझे ध्येय आहे. २००२ मध्ये कॅन्सरमुळे तिला पाय गमवावा लागला. तिने जेव्हा धावण्याचा संकल्प सोडला तेव्हा सर्वप्रथम गिनीज विक्रम पाहिला आणि नवे उद्दिष्ट ठेवले. हे लक्ष्य होते- १०४ दिवसांत १०४ मॅरेथॉन. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सांगितले की, विक्रमाच्या पुराव्यांच्या आढाव्यासाठी १२-१५ आठवडे लागतील.

जॅकने ब्लेड रनर्सच्या मदतीचा मार्ग प्रशस्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...