आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चीनने गेल्या वर्षी चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती अँट समूहाचा आयपीआेला स्थगिती दिली होती. जॅक मा यांनी चीन सरकारच्या आर्थिक, बँकिंग धोरणावर टीका केल्याने असा खोडा घातला गेला असावा, असा अंदाज लावण्यात आला होता. चीन सरकारने अँटच्या २.५१ लाख कोटी रुपयांच्या आयपीआेला राेखले होते. ‘वॉल स्ट्रीट जनरल’ने यासंबंधी एक दावा केला आहे. अँट समूहाच्या मालकीचे स्वरूप जटिल आहे. त्यामुळे चीन सरकारला चिंता वाटत होती. आयपीआेमुळे काही लोकांना लाभ होणार होता. त्यांच्याबाबतही सरकारच्या मनात संशय होता. चिनी सत्तेच्या निकटवर्तीय असलेल्या अनेकांची अँटमध्ये गुंतवणूक आहे. त्यापैकी अनेक व्यक्तींचा, तर राजकीय परिवारांशीदेखील संबंध आहे. त्यातून राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व त्यांच्या निकटवर्तीयांसाठी आव्हानाचे ठरू शकत होते.
अँट समूहात अनेक राजकीय नेते, अधिकाऱ्यांची भागीदारी होती. त्यांचा सरकारवर परिणाम होत होता. या मुद्द्यांवरून जिनपिंग यांच्या चिंतेत भर पडत होती. अँट समूह देशाच्या आर्थित पद्धतीसाठी जोखीम वाढवणारा होता. डझनभराहून जास्त सरकारी अधिकारी आणि सल्लागारांच्या हवाल्याने वॉल स्ट्रीट जनरल म्हणाले, आयपीआे सुरू होण्यापूर्वी सरकारने कंपनीचा तपास केला होता. कंपनीतील लोक जिनपिंग व त्यांच्या अंतर्गत वर्तुळासाठी आव्हान निर्माण करू शकत होता. कंपनी लिस्टेड होताच जॅक मा व कंपनीचे उच्च व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांच्या खिशात अब्जावधी डॉलर गेले असते. आपल्या ८ वर्षांच्या शासनकाळात जिनपिंग यांनी आपल्या अनेक शत्रूंना सरकारमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सरकारच्या नियंत्रणाची तुलना माआे से यांच्याशी केली जात आहे. आयपीआेद्वारे पैसा गोळा करण्याची अँटची योजना होती. परंतु त्यासाठी जिनपिंग यांनी सहमती दर्शवली नाही.
जिनपिंग यांनी हटवलेले अँटमध्ये सक्रिय : अँटमध्ये माजी नेते जियांग झेमीन यांचे पणतू जियांग झिचेंग यांची खासगी फर्म बायो कॅपिटलमध्ये भागीदारी होती. जियांग यांचे अनेक सहकाऱ्यांना जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेअंतर्गत हटवले होते. परंतु पडद्यामागे हे पदाधिकारी शक्तिशाली ठरत होते. पॉलिट ब्यूरो स्थायी समितीचे माजी सदस्य जिया क्विगलिन यांच्या जावयाची समूह शांघाय फेक्शनमध्ये भागीदारी होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.