आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तान:फाशीविरोधात फेरविचार याचिकेस जाधवांचा नकार, कुलभूषण यांच्याबाबत पाकिस्तानचा नवा दावा

इस्लामाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 17 जूनला दिला होता समुपदेशकाचा प्रस्ताव

पाकिस्तानातील तुरुंगात कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्याबाबत पाकने आता नवा दावा केला आहे. त्यानुसार जाधव यांनी आपल्या फाशीच्या शिक्षेविरोधात फेरविचार याचिका दाखल करण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या मते, जाधव यांनी आपल्या प्रलंबित दया याचिकेवर कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. एनएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पाकिस्तानचे अतिरिक्त अॅटर्नी जनरल अहमद इरफान यांनी बुधवारी पत्रकार परिषदेदरम्यान हा दावा केला. कुलभूषण यांना मार्च २०१६ मध्ये पाकिस्तानमध्ये अटक झाली होती, तर २०१७ मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यादरम्यान सुनावणीसाठी कुलभूषण यांना बाजू मांडण्यासाठी समुपदेशकही देण्यात आला नव्हता. याविरोधात भारताने २०१७ ला आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.

१७ जूनला दिला होता समुपदेशकाचा प्रस्ताव

अतिरिक्त अॅटर्नी जनरल यांनी सांगितले, १७ जून २०२० ला कुलभूषण जाधव यांना त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर फेरविचार याचिका दाखल करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी आपल्या कायदेशीर अधिकारांचा वापर करत असे करण्यास नकार दिला. त्यांना दुसरा समुपदेशक देण्याचा प्रस्तावदेखील देण्यात आला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser