आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहिंसा परमो धर्मः:अमेरिकेतील 40 विद्यापीठांत जैन अभ्यासक्रम, अहिंसा अन् सात्त्विक आहारावरही असेल भर

गौरव तिवारी | अहमदाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
४५० कोटी रुपये खर्च होणार, ९६ कोटी डॉ. जसवंत मोदी यांनी दिले - Divya Marathi
४५० कोटी रुपये खर्च होणार, ९६ कोटी डॉ. जसवंत मोदी यांनी दिले
  • अमेरिकेत २०२१ मध्ये ३४ शाळांसह ६९३ ठिकाणी गोळीबार

अमेरिकेत २०२१ मध्ये सामूहिक गोळीबाराच्या ६९३ घटना घडल्या. त्यापैकी ३४ घटना शाळांमध्ये घडल्या. हिंसेवर तोडगा काढण्याच्या आशेने फेडरेशन ऑफ जैन असोसिएशन नॉर्थ अमेरिकेच्या (जैना) प्रस्तावावर आता अमेरिकेतील ४० विद्यापीठांमध्ये जैन धर्माचे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. जैन धर्मावर पीएचडी आणि अहिंसा व सात्त्विक आहार या विषयावर स्वतंत्र अभ्यासक्रम असतील. पीएचडीसह ४० विद्यापीठांमधील ३० हून अधिक अभ्यासक्रम - जैन धर्मावरील अभ्यासक्रम सुरू करण्यास सहमती दर्शवलेल्या ४० विद्यापीठांमध्ये युनिव्हर्सिटी अाॅफ विस्कॉन्सिन (मॅडिसन), युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट, कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी (फ्रान्सो कॅलिफोर्निया), युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट अॅट स्टोअर्स, कॅरिटास कम्युनिटीकॉलेज (लॉस एंजलिस), युनिव्हर्सिटी अाॅफ इलिनॉय, युनिव्हर्सिटी अाॅफ फ्लोरिडा, युनिव्हर्सिटी अाॅफ कॅलिफोर्निया (लॉस एंजलिस) आणि युनिव्हर्सिटी अाॅफ इलिनॉय (अर्बाना) यांचा समावेश अाहे. येथे जैन धर्माशी संबंधित ३० पेक्षा जास्त अभ्यासक्रम आहेत अमेरिकेशिवाय इस्रायल, आखाती देश, आशियामध्येही हे अभ्यासक्रम सुरू होतील. भारतात बीएचयू आणि नालंदा विद्यापीठदेखील प्रस्ताव दिला जाईल.

अमेरिका जैन विद्यापीठांच्या सहकार्याने अभ्यासक्रमाची निर्मिती - अमेरिका व कॅनडामध्ये सुमारे १.५ लाख जैन आहेत. जैन संस्था अमेरिका, कॅनडा, युरोपमधील विविध विद्यापीठांच्या सहकार्याने अभ्यासक्रम विकसित करत आहे. त्याचा खर्च अमेरिकेत राहणाऱ्या जैन कुटुंबांनी दिलेल्या निधीतून केला जातो. या निधीतून जैन धर्मावरील संशोधन, प्राध्यापकांसाठी संस्कृत, प्राकृत आणि हिंदी भाषेतील स्पेशलायझेन करणे, अभ्यासक्रम तयार करणे, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आदींचा समावेश आहे. जैनाचे अध्यक्ष डॉ. कलिख जैन म्हणाले की, अलीकडे व्हेगन आणि अहिंसा यासारखे शब्द बोलले जात आहेत. आज शाकाहारी हा कल बनला आहे. जैन धर्म हजारो वर्षांपासून तेच सांगत आहे. अधिकाधिक लोकांना जैन धर्माची माहिती द्यावी, असे आम्हाला वाटले. तेव्हा आम्ही विद्यापीठांशी संपर्क साधला.

४५० कोटी रुपये खर्च होणार, ९६ कोटी डॉ. जसवंत मोदी यांनी दिले
या कामासाठी सुमारे ४५० कोटी रुपये खर्च हाेतील. जैनांनी देणगीतून उभारलेल्या पहिल्या टप्प्यात १५० कोटी रुपये खर्च हाेतील. शिकागो येथे राहणारे गुजरातचे डॉ.जसवंत मोदी यांनी ९६ कोटी रुपयांची देणगी दिली. दुसऱ्या टप्प्यात विद्यापीठ ३०० कोटी रुपये खर्च करेल.

बातम्या आणखी आहेत...