आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार जमाल खशोगी हत्याकांडाप्रकरणी सौदी प्रिन्सला सवलत:अमेरिका खटला चालवणार नाही, म्हणाले- पंतप्रधान मोदींवरील निर्बंधही हटवले होते

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खशोगी हत्या प्रकरणात अमेरिकेने सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना सवलत दिली आहे. व्हाईट हाऊसने 18 नोव्हेंबर रोजी ही माहिती दिली. अर्थात या खटल्यात त्यांच्यावर कारवाई होणार नाही. या निर्णयानंतर बायडेन सरकारवर टीकेची झोड उठली होती. कोणत्याही राष्ट्रप्रमुखाला कोणत्याही प्रकारची सूट देण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने स्पष्टीकरण देताना म्हटले.

दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांशी त्याचा काहीही संबंध नाही: व्हाईट हाऊस
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे संबंध गेल्या काही काळापासून चांगले चाललेले नाहीत. हे नाते पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रिन्स सलमानला सूट देण्यात आल्याचे मानले जात आहे. मात्र, व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते जॉन किर्बी यांचे या सगळ्याचा दोन्ही देशांमधील संबंधांशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे अमेरिका आणि सौदी अरेबियामधील संबंधांवर पुनर्विचार करत आहेत. कारण ऑर्गनायझेशन ऑफ क्रूड ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) ने 5 ऑक्टोबर रोजी तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे अमेरिका प्रचंड नाराज आहे. सौदी अरेबिया या गटाचा प्रमुख सदस्य आहे.

सौदी अरेबियाने तेलाचे उत्पादन वाढवावे, जेणेकरून जागतिक तेलाच्या किमती नियंत्रित ठेवता येतील, अशी अमेरिकेची इच्छा आहे.
सौदी अरेबियाने तेलाचे उत्पादन वाढवावे, जेणेकरून जागतिक तेलाच्या किमती नियंत्रित ठेवता येतील, अशी अमेरिकेची इच्छा आहे.

सौदीच्या क्राऊन प्रिन्सने खशोगी यांना मारण्याची परवानगी दिली होती
वॉशिंग्टन पोस्टचे सौदी पत्रकार जमाल खशोगी यांना ‘पकडणे किंवा ठार मारणे’ या मोहिमेला मंजुरी दिली होती, असा धक्कादायक दावा अमेरिकी काँग्रेसला सादर करण्यात आलेल्या एका गुप्त अहवालात करण्यात आला आहे. बायडेन प्रशासनाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

अमेरिकन वृत्तपत्राने अॅग्नेस कॅलामार्ड यांचा दाखला देत हत्येशी संबंधित पुराव्यांच्या आधारावर सौदीचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान व त्यांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांनी खाशोगींची हत्या केल्याचा दावा केला होता.
अमेरिकन वृत्तपत्राने अॅग्नेस कॅलामार्ड यांचा दाखला देत हत्येशी संबंधित पुराव्यांच्या आधारावर सौदीचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान व त्यांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांनी खाशोगींची हत्या केल्याचा दावा केला होता.

ट्रम्प सत्तेत होते, तेव्हा त्यांचे सौदी राजकुमारांशी जवळचे संबंध होते. त्यामुळेच खशोगी यांच्या हत्येशी संबंधित अमेरिकन गुप्तचर अहवाल त्या काळात प्रसिद्ध झाला नव्हता. बायडेन अध्यक्ष झाले आणि त्यांची मानवाधिकारांबाबतची भूमिका नेहमीच कठोर राहिली आहे. त्यानंतर हा अहवाल प्रसिद्ध झाला. या गुप्तचर अहवालात खशोगी यांच्या हत्येसाठी प्रिन्स सलमानचे थेट नाव घेण्यात आले होते.

ऑक्टोबर 2018 मध्ये खशोगी यांची हत्या

इस्तंबूल येथील सौदी अरेबियाच्या वाणिज्य दूतावासात राजपुत्राच्या सहाय्यकांनी त्यांची 2 ऑक्टोबर 2018 रोजी हत्या केली होती. त्यांच्या मृतदहाचे तुकडे करण्यात आले होते. त्याचे अवशेषही अद्याप सापडलेले नाहीत. अमेरिकेत वास्तव्यास असणारे आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’साठी लिखाण करीत असलेले 59 वर्षांचे खाशोगी हे राजकुमार सलमान यांच्या धोरणांवर टीका करीत असत. सौदीतील धोक्याची कल्पना असल्यानेच खशोगींनी अमेरिकेत आश्रय घेतला होता.

अमेरिकेने अनेक नेत्यांना सूट दिली
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले की, अमेरिकेने यापुर्वीही अनेक नेत्यांनाही सूट दिली आहे. 1993 मध्ये हैतीचे राष्ट्राध्यक्ष अरिस्टाइड, 2001 मध्ये झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष मुगाबे, 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान मोदी आणि 2018 मध्ये काँगोचे राष्ट्राध्यक्ष काबिला यांनाही सूट देण्यात आली होती. गुजरात दंगलीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने नरेंद्र मोदींवर प्रवास बंदी घातली होती. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. पण नंतर पंतप्रधान झाल्यावर त्यांना सवलत देण्यात आली. म्हणजेच त्याच्यावर लादलेली प्रवासी बंदी उठवण्यात आली.

अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारला होता.
अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारला होता.

10 वर्षांची बंदी होती
अमेरिकन सरकारने मोदींवर जवळपास 10 वर्षे प्रवासी बंदी घातली होती. अमेरिकेने नरेंद्र मोदी यांना व्हिसा नाकारला होता. 2002 मध्ये गोध्रा दंगलीच्या काळात मानवी हक्काचे उल्लंघन झाले होते. त्या वेळी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर होते. त्यामुळे त्यांना व्हिसा देण्यास अमेरिकेने नकार दिला होता.

बातम्या आणखी आहेत...