आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मिरातून कलम ३७० रद्द केल्याच्या निर्णयाला उद्या वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने पुन्हा एकदा कुरापत काढली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी कॅबिनेट बैठकीत देशाच्या नवीन राजकीय नकाशाला मंजुरी दिली. या नकाशामध्ये जम्मू काश्मीर-लडाख, सियाचीनसह गुजरातमधील जुनागडही पाकिस्तानचा भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे.
पाक कॅबिनेटची मंजुरी; शाळांमध्ये हाच नकाशात
पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले की, या निर्णयाचे विरोधी पक्षांसह काश्मिरी नेतृत्वाने स्वागत केले आहे. पाकमधील शाळा, कॉलेज आणि सर्व कार्यालयांमध्येही हाच अधिकृत नकाशा असेल. भारताने गतवर्षी ५ ऑगस्टला घेतलेला निर्णय हा नकाशा नाकारत आहे. दरम्यान, सध्या पाकिस्तान मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत असल्याच्याही बातम्या आहेत. दरम्यान, पाकिस्तानने जम्मू-काश्मीरसह नव्या नकाशाला दिलेल्या कथित मंजुरीवर भारताने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.