आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिलवरील हिंसाचाराबाबत तपास समिती ट्रम्प यांच्यावर तीन फौजदारी खटले दाखल करणार असल्याची माहिती आहे. समिती लवकरच शिफारस करू शकते. पॅनल कोणत्या आरोपांच्या आधारे ही शिफारस न्याय विभागाकडे पाठवणार हे अद्याप सांगण्यात आलेले नाही.
ट्रम्प यांच्यावर देशद्रोह, सरकारी कामकाजात अडथळा आणणे आणि फेडरल सरकारची फसवणूक करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. यासह अमेरिकन हाउस कमिटी 20 डिसेंबरला त्यांच्या कर संबंधित बाबी लपविण्यावरही निर्णय घेऊ शकते. 2015-2020 मधील माजी अध्यक्षांचे कर रेकॉर्ड सार्वजनिक करायचे की नाही यावर सभागृह समितीने मतदान करणे अपेक्षित आहे.
ट्रम्प यांची कंपनी व्यावसायिक फसवणुकीसाठी दोषी
ट्रम्प ऑर्गनायझेशन ही कौटुंबिक रिअल इस्टेट कंपनी अनेक फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये दोषी आढळली आहे. जवळपास महिनाभर चाललेल्या खटल्यात न्यायमूर्तींनी ट्रम्प यांच्या कंपनीला 17 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले. कोर्टाने आपल्या निकालात म्हटले आहे की, कंपनीने अनेक अधिकाऱ्यांना लक्झरी अपार्टमेंट, मर्सिडीज बेंझ आणि ख्रिसमससाठी अतिरिक्त रोख रकमेवरील कर चुकवण्यासाठी मदत केली आहे. ज्युरींनी ट्रम्प यांच्या कंपनीला व्यावसायिक फसवणुकीसाठी दोषी ठरवले. ज्यासाठी त्याच्यावर 13 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ट्रम्प ऑर्गनायझेशनला सर्व 17 गुन्ह्यांवर दोषी ठरवल्यानंतर मॅनहॅटनचे वकीलांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले की, हे प्रकरण खोटे बोलणे, फसवणूक करणे आणि अनेक लोकांना आणि कंपन्यांना कर चुकवण्यास मदत करणे यासंबंधी आहे.
कंपनीकडून एक निवेदन जारी
त्याचबरोबर या निकालावर टीका करताना ट्रम्प यांच्या कंपनीकडूनही एक निवेदन जारी करण्यात आले आहे. कंपनीने आपल्या बचावात म्हटले आहे की, कर्मचाऱ्याने हे सर्व काम आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी केले, अशा परिस्थितीत कंपनीलाच दोष देणे मूर्खपणाचे आहे.
ट्रम्प यांना माहिती नव्हती
कंपनीच्या सुनावणीचे निकाल ट्रम्प यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या वकिलाने सर्वतोपरी प्रयत्न केले. ते म्हणाले की सर्व साक्षीदारांनी वारंवार पुनरुच्चार केला आहे. की, ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाला या गुन्ह्यांची माहिती नव्हती. हा खटला ट्रम्प यांच्यावरील सार्वमत नाही. असेही त्यांनी ट्रायल ज्युरीला सांगितले. त्यामुळे या प्रकरणाकडे खुल्या मनाने पाहिले पाहिजे. मात्र, अशी कागदपत्रेही न्यायालयात सादर करण्यात आली. ज्यात अधिकाऱ्यांना भेट दिलेल्या अपार्टमेंटच्या कागदांवर ट्रम्प यांची स्वाक्षरी होती.
कॅपिटल हिल हिंसाचारात कारवाई
अमेरिकेतील कॅपिटल हिल (यूएस संसद) येथे 6 जानेवारी 2021 रोजी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्याबाबत सुनावणी करत असलेल्या यूएस काँग्रेस कमिटीने या हिंसाचारासाठी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरले आहे.
समितीचे अध्यक्ष बेनी थॉम्पसन म्हणाले की, ट्रम्प कारवाई करण्यात अपयशी ठरले नाहीत. उलट त्यांनी हिंसाचाराच्या वेळी कारवाई न करण्याचा निर्णय घेतला. 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलटवण्यासाठी त्यांनी अराजकता आणि भ्रष्टाचाराचा मार्ग निवडला. त्यांनी खोटे बोलून आपल्या पदाचा गैरवापर केला. त्यांनी लोकशाही संस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
सुनावणीतील ठळक मुद्दे
व्हाईट हाऊस 3 गटांमध्ये विभागले गेले
गेल्या सुनावणीत एक गट ट्रम्प यांना हिंसाचार थांबवण्यास सांगत असल्याचे सांगण्यात आले. या गटात त्यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांचा समावेश होता. दुसऱ्या गटात ट्रम्प यांचे काही सल्लागार होते. या प्रकरणी ते तटस्थ होते. कारवाई करावी लागेल. पण ट्रम्प लगेच कारवाई करणार नाहीत, हे ्यांना माहीत होते. तिसरा गट डिफ्लेक्टिंग-ब्लेम श्रेणीचा होता. यामध्ये व्हाईट हाऊसचे माजी चीफ ऑफ स्टाफ मार्क मेडोज यांचा समावेश होता. या गटाने म्हटले आहे की, जे हिंसाचार करत होते ते ट्रम्प समर्थक नव्हते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.