आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपत्ती:जपान - ऑलिम्पिकसाठी हव्या आहेत 500 नर्स; तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधी आहे शिल्लक

टोकियोएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 78 हजार स्वयंसेवकांना सॅनिटायझर, मास्क भेटेल, लसीचा मात्र पत्ता नाही

जपानमध्ये सध्या कोरोना आणि ऑलिम्पिकचे आयोजन सरकार व लोकांमध्ये वादाचा विषय झाले आहेत. एकीकडे महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. दुसरीकडे, २३ जुलैपासून तेथे ऑलिम्पिकचे आयोजन होत आहे. स्पर्धा होईल की नाही याबाबत संभ्रम आहे. आयोजकांनी नुकतीच जपानी नर्सेस असोसिएशनकडे ५०० नर्सेसची स्वयंसवेक म्हणून मागणी केली आहे. त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. आयाेजकांनुसार स्पर्धेत जवळपास १० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज भासेल. जपान फेडरेशन ऑफ मेडिकल वर्कर्स युनियन्सचे सरचिटणीस सुसुम मोरिता म्हणतात की, सध्या महामारीला प्राधान्य द्यायला हवे. नर्स आधीपासूनच महामारीविरोधात लढत आहेत. ऑलिम्पिकमध्ये नेमणूक योग्य नाही.

चौथ्या लाटेचे केंद्र ओसाकामध्ये ना खाटा ना रुग्णवाहिका
जपानचे ओसाका राज्य चौथ्या लाटेचे केंद्र आहे. रुग्णालयात लोकांना बेड भेटत नाहीत. रुग्णवाहिकेसाठीही प्रतीक्षा करावी लागते. जवळपास १२.५ कोटी लोकसंख्येच्या जपानमध्ये आतापर्यंत २% पेक्षाही कमी लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. टोकियोत कोरोनामुळे दुसऱ्या आजाराच्या रुग्णांना उपचार भेटत नाहियेत.

७८ हजार स्वयंसेवकांना सॅनिटायझर, मास्क भेटेल, लसीचा मात्र पत्ता नाही
ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन महामारीमुळे जपानसाठी आव्हान झाले आहे. ही स्पर्धा सुपरस्प्रेडर इव्हेंट ठरू नये हे सर्वात मोठे आव्हान आहे. या स्पर्धेसाठी जवळपास ७८ हजार स्वयंसेवक लागतील. सर्वांना महामारीपासून वाचण्यासाठी मास्क, सॅनिटायझरसारख्या वस्तू भेटतील. तसेच त्यांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे व दुसऱ्यांकडून करवून घेण्याचेही शिकवले जाईल. मात्र, लसींबाबत कोणीच बोलत नाही.

स्पर्धेसाठी तीन महिन्यांपेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. टोकियोतील ४० वर्षांचे अकीको करिया ऑलिम्पिकमध्ये स्वयंसेवक आहेत. दुभाषी म्हणून त्यांची नेमणूक आहे. अकीको सांगतात, ऑलिम्पिक समितीने त्यांना अद्याप सांगितलेले नाही की, आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी काय करतील. तसेच जपानी खेळाडूंनाही लस दिली जाईल याबाबतची माहिती स्पष्टपणे कोणाकडेच नाही. संसर्ग होण्याच्या भीतीने अनेक स्वयंसेवक स्पर्धा सोडून जाण्यास बाध्य होत आहेत. आयोजकांनी अद्याप ठरवलेले नाही की, संसर्ग रोखण्यासाठी कोरोना चाचणी कशी होईल, याची योजनाच तयार नाही.

स्पर्धेसाठी हवेत १० हजार आरोग्य कर्मचारी
कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या जपानमध्ये ऑलिम्पिकला िवरोध होत आहे. अनेक शहरातील पालिकांनी ते स्थलांतर करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...