आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळवारी लिफ्ट ऑफ केल्यानंतर जपानने त्यांचे H3 मीडियम रॉकेट नष्ट केले. जपानच्या एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA) कडून प्रक्षेपित केल्यानंतर रॉकेटचे दुसऱ्या टप्प्यातील इंजिन निकामी झाले. यानंतर JAXA ने रॉकेटला सेल्फ-डिस्ट्रक्ट सिग्नल पाठवले.
या रॉकेटमध्ये ALOS-3 ऑब्झर्व्हेशनल सॅटेलाइट होते. हे एक डिझास्टर मॅनेजमेंट सॅटेलाइट आहे, ज्यात एक इन्फ्रारेड सेन्सर बसवलेला होता. त्याच्या मदतीने उत्तर कोरियाचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र शोधले जाऊ शकले असते. याशिवाय या रॉकेटचा उपयोग सरकारी आणि व्यावसायिक उपग्रहांना पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवण्यासाठीही करण्यात येत होता.
प्रक्षेपणानंतर रॉकेटमध्ये दिसली आली गडबड
मंगळवारी सकाळी 10.37 वाजता अंतराळ केंद्रातून रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. सुरुवातीला हे मिशन यशस्वी घोषित करण्यात आले. पण काही काळानंतर रॉकेटमध्ये समस्या दिसू लागल्या. JAXA या अंतराळ संस्थेच्या उद्घोषकाने सांगितले - रॉकेटचा वेग कमी होताना दिसत आहे. दुसऱ्या टप्प्यातील इंजिन सुरू होण्याची अद्याप खात्री पटलेली नाही.
17 फेब्रुवारीलाही रद्द केले होते प्रक्षेपण
रॉकेट लाँचिंगचे थेट प्रक्षेपण केले जात होते. बिघाडामुळे काही काळ हे थांबवण्यात आले. जेव्हा प्रसारण पुन्हा सुरू झाले, तेव्हा अंतराळ संस्थेने घोषणा केली की, रॉकेट नष्ट केले जात आहे कारण ते मिशन पूर्ण करू शकणार नाही. यापूर्वी 17 फेब्रुवारीला जपानने H3 रॉकेटचे प्रक्षेपण रद्द केले होते. तेव्हा त्याचे सेकंडरी बूस्टर इंजिन सुरू होऊ शकले नव्हते. लाँचिंग काउंटडाउन संपताच लिफ्ट-ऑफच्या आधी ते थांबवण्यात आले.
जपान आपल्या मिशनसाठी SpaceX वर अवलंबून
एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटचा प्रतिस्पर्धी म्हणून H3 रॉकेटकडे पाहिले जात होते. वास्तविक, जपानने डिसेंबरमध्ये एक क्राफ्ट लॉन्च केले. हे जगातील पहिले कमर्शियल लूनर लँडर असू शकते. यादरम्यान जपानी उद्योगपती युसाकू मेजावा यांनीही त्यांच्या क्रू मेंबर्सची माहिती दिली होती, जे पहिल्यांदाच चंद्रावर जाणार आहेत.
मात्र, हे दोन्ही जपानी प्रकल्प स्पेसएक्सच्या रॉकेटवर अवलंबून आहेत. रशियन रॉकेटच्या अनुपस्थितीत, जपानवर स्वतःची डिलिव्हरी यंत्रणा बनवण्याचा दबाव आहे, जेणेकरून ते आपल्या रॉकेटद्वारे मिशन पूर्ण करू शकतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.