आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:जपान : टोकियोसह ४ शहरांतील निम्म्यालोकांना वाटते-गड्या, आपला गाव बरा, मूळ गावी, ग्रामीण भागात स्थायिक होण्याची इच्छा

टोकियो10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्टोबरमधील संभाव्य दुसऱ्या लाटेच्या भीतीने ग्रासले

जपानमध्ये २५ मे रोजी आणीबाणी हटवण्यात आल्यानंतर बुधवारी पहिल्यांदाच सर्वाधिक ५५ कोरोना रुग्ण आढळले. त्यापैकी ९ रुग्ण अस्थायी रोजगार देणाऱ्या एका कंपनीचे कर्मचारी आहेत. त्याशिवाय १२ रुग्ण नाइट लाइफसाठी प्रसिद्ध कुबिकिचो शहरात आढळून आले. टोकियोचे गव्हर्नर युरिको कोइकोने आपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा निश्चित करण्यास सांगितले आहे. जपानमध्ये आतापर्यंत १८ हजार २४ बाधित आढळून आले असून मृतांची संख्या ९६३ आहे. राजधानी टोकियो, दक्षिणेकडील कितक्युशु, उत्तरेकडील शहर होकाइडो हॉटस्पाॅट ठरले आहेत. जपानमध्ये असोसिएशन ऑफ इन्फेक्शियस डिजिजचे अध्यक्ष काजुहिरो टेड्डा म्हणाले, ऑक्टोबरपासून देशात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. त्यामागे शहरी जीवन असे कारण मानले जाते. एका पाहणीनुसार जपानमधील लोक प्रचंड घाबरून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या मनात कोरोना संसर्गाची प्रचंड दहशत आहे. टोकियो आणि परिसरातील कनागावा, चिबा, सीतामा येथील सुमारे ५० टक्के लोकांना ग्रामीण भागात किंवा आपल्या मूळ गावी जाऊन स्थायिक होण्याची इच्छा आहे. कॅबिनेट सचिवालयाने १० हजार लोकांवर ही पाहणी केली होती. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अशाच प्रकारच्या पाहणीत २३ टक्के लोकांनी गावाकडे जाऊन स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली होती. सरकारही अशा लोकांना प्रोत्साहन देत आहे. टोकियो महानगर क्षेत्र सोडून गावी परतणाऱ्या लोकांना सरकार २१ लाख रुपये देणार आहे. टोकिया महानगर भागात ३.६० कोटी लोक राहतात. क्षेत्रफळ २ हजार १८८ चौरस किमी आहे. आधी लोक चांगला रोजगार व शिक्षणासाठी शहरांकडे आले. एका पाहणीनुसार आता ५५ टक्के लोकांना नैसर्गिक वातावरणासाठी गावाकडे जाण्याची इच्छा आहे. १६ टक्के लोकांना पूर्वजांचे मूळ घर असलेल्या भागात जाणे पसंत आहे. त्यांना जवळच्या लोकांची कमतरता आहे. यासंबंधी सरकारने एक संकेतस्थळही तयार केले आहे. त्याद्वारे लोकांना त्यांच्या समुदायाबद्दलची माहिती व तेथे मिळणाऱ्या अनुदानाबद्दलची माहिती उपलब्ध करून दिली जाते. टोकियोच्या कियोको इव्हामुरा (४०) या कार कंपनीत काम करतात. इव्हामुरा म्हणाल्या, माझ्या गावातील खुल्या वातावरणाची मला येथे कमतरता वाटू लागते. म्हणूनच आता गावी परतू इच्छिते. माझ्या शेजाऱ्यांना एकटेपणा वाटतोय.त्यांची घरे लहान आहेत. त्यांचे जास्त मित्रही नाहीत. ते स्वत:ला एकटे समजतात.

११ हजार रुपयांत समुद्र किनारी भाड्याने घर
निसर्गाने भरभरून दिलेल्या जपानमधील छोट्या शहरांतून नवे प्रस्ताव दिले जात आहेत. सुवानो शहरातील प्रशासनाने २५ वर्षे राहण्याचा करार केल्यास २१ हजार रुपये मासिक भाड्याने फॅमिली हाऊस देऊ केले आहे. बेटांचे शहर कुरोशिमा समुद्र किनारी ११ हजार रुपयांत मासिक भाड्याने घर देत आहे.
टोकियो : रेस्तराँमध्ये कोरोनापासून बचावासाठी खुर्च्यांवर डिस्टन्सिंगचा सल्ला आहे.

बातम्या आणखी आहेत...