आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Japan Has The Lowest Number Of Marriages In 71 Years, With Birth Rates Falling In 122 Years; Wedding Companies Give Young People The Experience Of Being A Bride News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:जपानमध्ये ७१ वर्षांत सर्वात कमी विवाह, जन्मदरातही १२२ वर्षांत झाली घट; वेडिंग कंपन्या तरुणींना देताहेत वधू होण्याचा अनुभव!

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तरुणांचा विवाहाबाबत होतोय झपाट्याने मोहभंग; जपान वेगाने होतोय आता वृद्ध

कोरोना महामारीशी जपानची अर्थव्यवस्था झुंज देत आहे. रोजगार संपत चालले आहेत. बँकेत थोडाथोडका पैसा आणि भविष्याबद्दलच्या अनिश्चिततेमुळे जपानमधील तरुणांचा विवाहातील रस कमी झालाय. तरुणांची रुची कमी झाल्याने जपानची लोकसंख्या संकुचित होत आहे. देशातील वृद्धांची संख्या वाढतेय. देशाच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०२० मध्ये केवळ ५३७,५८३ विवाह झाले. येथे २०१९ च्या तुलनेत विवाह १२.७ टक्के कमी झाले. १९५० नंतर पहिल्यांदाच एवढी घट झाली. २०२० मध्ये ८७२६८३ मुलांचा जन्म झाला. २०१९ च्या तुलनेत २५,९१७ मुले जन्मली. १८९९ नंतर मुलांच्या जन्मदरात सर्वाधिक घट दिसून आली. टोहोकू विद्यापीठातील संशोधकांच्या मते हा ट्रेंड बदलला नाही तर जपानमध्ये ३७६६ वंश लुप्त होऊ शकतात.

या नव्या आकड्यांमुळे वंश नामशेष होण्याच्या शंकेला आणखी गती दिली. हा ट्रेंड वाढत असल्याने अनेक वेडिंग कंपन्यांनी लोकांना विवाहासाठी प्रेरणा देण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी अनेक कल्पक योजना मांडण्यात आल्या आहेत. जुन्या आर्थिक व सामाजिक अनिश्चिततेसोबत महामारीने त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. उदाहरणार्थ सर्का ट्रॅव्हल कंपनीने तरुणींना विवाहाचा अनुभव यावा यासाठी वेडिंग पॅकेज सुरू केले होते. त्यासाठी तरुणींना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी वधूचा साजश्रंृगार केला जात होता.

एवढेच नव्हे तर विवाहाचे सर्व विधी देखील होत. अशा विवाहासाठी भाड्याने वर आणि पाहुण्यांना बोलावले जात. अशा विवाहाचा अल्बमही केला जातो. ही मूळ कल्पना कंपनीच्या अध्यक्ष युकिको इनोयु यांची होती. अशा आयोजनांतून महिलांना सकारात्मकता मिळत होती. त्या आपल्या स्वप्नांना जगत. परंतु लोकांनी त्यात पुरेसा रस घेतला नाही. म्हणून आम्ही हे पॅकेज बंद केले. आगामी काळ असा असेल, असा १५ वर्षांपूर्वी कोणी विचारही केला नसावा. परंतु आजची परिस्थिती दयनीय आहे.

कंपन्यांचा ऑनलाइन विवाहाचा प्रस्ताव, लोक ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे
वेडिंग कंपन्यांनी ऑनलाइन विवाहांचा देखील प्रस्ताव मांडला आहे. गो यामाकोशी हे एका विवाह मंडळात काम करतात. ते म्हणाले, आम्ही गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ऑनलाइन डेटिंग व्यवस्था सुरू केली होती. तेथे आता लोकांची संख्या दुप्पट झाली. सरकारने लोकांना बाहेर जाण्यासाठी रोखताच लोक ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळले.

बातम्या आणखी आहेत...