आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Japan Is Holding A National Competition To Increase Alcohol Consumption Among The Youth And Fill The Government Offers

दिव्‍य मराठी विशेष:तरुणांमध्ये दारूचा खप वाढावा अन् सरकारी तिजोरी भरावी यासाठी राष्ट्रीय स्पर्धा भरवत आहे जपान

टोकियो3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानमध्ये सरकारी तिजोरी भरण्यासाठी आता तरुणांना जास्त दारू पिण्यासाठी प्रेरित केले जात आहे. यासाठी नॅशनल टॅक्स एजन्सी द शॅक वीवा नावाचे अभियान राबवत आहे.

या अभियानाच्या माध्यमातून जास्त दारू पिण्याच्या टिप्स सांगितल्या जात आहेत आणि राष्ट्रीय स्पर्धाही आयोजित केल्या जात आहेत. यामागे दारूच्या माध्यमातून होणारे उत्पन्न पुन्हा वाढावे हा जपान सरकारचा उद्देश आहे. वस्तुत: कोरोनानंतर तरुणांच्या जीवनशैलीत बदल झाला आहे. तसेच दारूचा खपही वेगाने घटला आहे. परिणामी जपान सरकार 9 सप्टेंबरपर्यंत अभियान राबवत 20 ते 39 वर्षे वयाच्या लोकांना दारू पिण्यासाठी प्रेरित करत आहे. यासाठी दारूची नवी उत्पादने आणि डिझाइन बनवले जात आहे. जास्त दारू पिणाऱ्या विजेत्याला 10 नोव्हेंबरला टोकियोत होणाऱ्या सोहळ्यात सन्मानित केले जाईल. या अभियानांतर्गत घरात दारू पिण्याच्या सवयीला प्रोत्साहन दिले जात आहे. तांदळाची दारू, बिअर, व्हिस्की, वाइन आदी मद्याची विक्री वाढवण्यासाठी मेटावर्स आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. एकमेकांसोबत गहन चर्चा करण्यासाठी मित्रांना दारू पिण्याचे फायदे सांगितले जात आहेत. 2019 आणि 2020 मध्ये बिअरचा खप 20 टक्क्यांवरून 1.8 अब्ज लिटर इतका कमी झाला. तथापि, कोरोनाकाळात वर्क फ्रॉम होमदरम्यान थोडी वाढ झाली होती.

40 वर्षांत दारूमुळे मिळणारा महसूल 3.3 टक्के घटला
1980 मध्ये जपान सरकारला अल्कोहोल उत्पादनांतून 5% उत्पन्न मिळायचे. 2020 मध्ये ते 1.7% इतके कमी झाले. 40वर्षांत दारूतून होणारी कमाई 3.3 टक्क्यांनी घटली. 1995 मध्ये माणशी 100 लिटर दारूचा खप व्हायचा. तथापि, 2020 मध्ये 75 लिटर होत आहे.

बातम्या आणखी आहेत...