आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Japan Medical Student Fail | Marathi News | Scam To Deprive Women! Gaudbengal Of Medical Admission In Japan Revealed

परीक्षा व्यवस्थेमध्ये पारदर्शकतेची मागणी:महिलांना नापास करण्याचा घोटाळा! जपानमध्ये मेडिकल प्रवेशाचे गौडबंगाल उघडकीस

टोकियो6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादा घोटाळा म्हटल्यावर आर्थिक गैरव्यवहार वाटतो. परंतु जपानमध्ये अजब प्रकारचा घोटाळा उजेडात आला आहे. त्यात मेडिकल स्कूलमधील प्रवेशात महिला उमेदवारांना जाणूनबुजून नापास केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. लिंगभेदातून अशी प्रक्रिया राबवली जात होती. जपानच्या शिक्षणमंत्र्यावर झालेल्या एका आरोपानंतर हा घोटाळा समोर आला. मंत्र्याने आपल्या मुलासाठी टोकियाे विद्यापीठात शिफारस केल्याचे हे मूळ प्रकरण आहे. मंत्रिपुत्राला प्रवेश देण्यासाठी पात्र महिला उमेदवाराचे नाव प्रवेश यादीतून वगळण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर जपानच्या १० प्रतिष्ठित वैद्यकीय शिक्षण संस्थांनीही जास्त पुरुष उमेदवारांना प्रवेश देण्यासाठी महिला उमेदवारांना नाकारण्यात आल्याचे मान्य केले.

खरे तर २०१३ पासून जपानच्या शिक्षण मंत्रालयाने या प्रवेश प्रक्रियेची नोंद ठेवण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार गेल्या आठ वर्षांतील प्रवेश प्रक्रियेतील आकडेवारीचा आढावा घेण्यात आला. तेव्हा २०२१ मध्ये झालेल्या परीक्षेतील निकाल पूर्णपणे बदलला. महिला उमेदवाराच्या तुलनेत पुरुष उमेदवार नेहमीच २.०५ टक्क्यांनी पुढे राहिले होते. मात्र या वेळी पहिल्यांदाच महिला उमेदवारांचा टक्का जास्त आला. त्यामुळेच यंदा महिलांची संख्या कमी होऊ दिलेली नाही, असे स्पष्ट करण्याची वेळ नंतर शिक्षणमंत्र्यांवर आली. म्हणूनच उत्तीर्ण होणाऱ्या महिलांचे प्रमाणही या वेळी जास्त आहे. त्यावरून मागील परीक्षांत महिला उमेदवारांचे गुण नियोजितपणे कमी केले जात होते, हे जाहीर झाले आहे.

जपानमधील शिक्षण संस्थांवर लिंगभेदाला प्रोत्साहन देत असल्याचा आराेप केला जात आहे. आता परीक्षा मंडळाच्या कारभारात पारदर्शकता आणली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. चिकित्सेच्या क्षेत्रात महिला शिक्षणानंतर काही दिवसांत प्रापंचिक जबाबदारी पार पाडताना डॉक्टर म्हणून करिअर सोडून देतात, असा शिक्षण संस्थांचा तर्क आहे. कौटुंबिक व्यवधानातून त्या वेळ काढू शकत नाहीत. त्यामुळे त्या क्षेत्र सोडून देतात, असे मेडिकल स्कूलचे म्हणणे आहे. याशिवाय आजवर सातत्याने भेदभाव करणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये २०२१ मधील परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त होते.

बातम्या आणखी आहेत...